agriculture news in Marathi, Dr. Anil Bonde says, cases against insurance companies if found guilty, Maharashtra | Agrowon

दोषी आढळल्यास विमा कंपन्यांवर गुन्हेः डाॅ. अनिल बोंडे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जुलै 2019

कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करतील आणि त्या जर दोषी आढळल्या तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरुवारी (ता. १८) पत्रकार परिषदेत दिला. येथे कृषी विभागाच्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करतील आणि त्या जर दोषी आढळल्या तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरुवारी (ता. १८) पत्रकार परिषदेत दिला. येथे कृषी विभागाच्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कृषिमंत्री डॉ. बोंडे म्हणाले, की नैसर्गिक संकटातून पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी यासाठी विमा योजना सुरू करण्यात आली. राज्यात लाखो शेतकरी विमा योजनेचा लाभ घेत आहेत, पण अनेक कारणाने याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यास विमा कंपन्या असमर्थ ठरत आहेत. अनेकदा शेतकऱ्यांना लाभ देताना त्यांना अडचणीत आणले जाते.

याबाबत सरकार गंभीर आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी काही अटीत बदल करण्याबाबत विचार सुरू आहे. शेतकरी पात्र असेल व संबधित विमा कंपनी त्यांना लाभ देत नसेल तर त्या कंपनीच्या विरोधात कारवाई करू. शेतकऱ्यांची कुचंबना जर कोणती कंपनी करीत असेल तर त्या कंपनीला माफ करणार नाही. डॉ. बोंडे यांनी या वेळी कोल्हापूर विभागात कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या हवामान आधारित फळपीक योजना, गटशेतीअंतर्गत झालेली कामे, रोजगार हमी योजनेच्या सद्यस्थितीविषयी माहिती दिली. 

सधन जिल्ह्यातही आत्महत्या
कोल्हापूरसारख्या सधन जिल्ह्यातही आत्महत्या होत आहेत. पण याची कल्पना कृषी अधिकाऱ्यांनी दिली नाही. मला पत्रकारांच्या मार्फतच समजले, याचा जाब विभागीय कृषी सहसंचालकांना विचारू. सधन जिल्ह्यातही आत्महत्या का होत आहेत याची चौकशी करण्यात येईल. बोगस बियाणे आणि खते पुरवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करू, त्यांना काळ्या यादीत टाकू, या कामात कुचराई केलेल्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करू, असे डॉ. बोडे यांनी या वेळी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...