निष्कर्षाअंतीच ड्रोनचा वापर ः कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

डाॅ. अनिल बोंडे
डाॅ. अनिल बोंडे

नागपूर ः फवारणीकामी ड्रोनची चाचणी आणि त्याद्वारे शेतीकामी याचा वापर व परिणामकारकता सिद्ध करण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांना निर्देशित केली जाईल. त्या निष्कर्षांच्या आधारेच शेतीकामी ड्रोन वापरा संदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. बुधवारी (ता. २५) नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी ‘ॲग्रोवन’शी संवाद साधला.  राज्यात फवारणीकामी ड्रोनचा वापर वाढविण्यासंदर्भाने हालचाली सुरू आहेत. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत मायवाडी (ता. मोर्शी) येथे प्रात्याक्षीक घेण्यात आले. त्यापूर्वी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात प्रायोगीक तत्त्वावर ड्रोनने फवारणी करण्यात आली. नुकताच कृषी विद्यापीठाने एका फवारणीकामी ड्रोन उत्पादन करणाऱ्या कंपनीशी सामंजस्य करारदेखील केला आहे. या सर्व घडामोडीत फवारणीची परिणामकारकता व साध्य याविषयी मात्र चर्चाच होत नसल्याची बाजू समोर आली आहे. नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देण्यापूर्वी त्याच्या चाचण्या होणे गरजेचे आहे.  ड्रोनच्या बाबतीत आजवर राज्यातील एकाही विद्यापीठाने भूमिका स्पष्ट केली नाही किंवा कोणताच निष्कर्ष देखील मांडलेला नाही. त्यामुळे कृषी विभागदेखील या तंत्रज्ञानाच्या उपयोगीतेबद्दल शासंक आहे. कृषी आयुक्‍त सुहास दिवसे यांनीदेखील हा मुद्दा गेल्या आठवड्यात उपस्थित केला होता. त्यानंतर आता कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनीदेखील चाचण्याअंतीच ड्रोनने फवारणीचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. राज्यातील कृषी विद्यापीठांवर हे काम सोपविले जाणार आहे. ड्रोनच नाही तर शेतीपूरक कमी खर्चाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी विकसित करण्याच्या सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. त्या संदर्भात नियमित आढावा घेण्याची व्यवस्थादेखील निर्माण केली जाणार असल्याचेही डॉ. बोंडे यांनी सांगितले.  पारंपरिकऐवजी जागतिकस्तरावर उपलब्ध तंत्रज्ञान राज्यातील शेतकऱ्यांना मिळण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com