agriculture news in Marathi, dr. anil bonde says, focus on water management due to drought, pune, maharashtra | Agrowon

दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी व्यवस्थापनावर भरः डाॅ. अनिल बोंडे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा लागणार आहे. दरवर्षी कमी पाऊस होत असल्याने दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. दुष्काळावर दरवर्षी सरकारचे चार ते पाच हजार कोटी रुपये खर्च होतात. यावर मार्ग काढण्यासाठी दरवर्षी कृत्रिम पावसाचे प्रयोग करणार आहे. यंदा कृत्रिम पावसासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुढील काळात अर्थसंकल्पात शंभर कोटींची तरतूद केली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. 

पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा लागणार आहे. दरवर्षी कमी पाऊस होत असल्याने दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. दुष्काळावर दरवर्षी सरकारचे चार ते पाच हजार कोटी रुपये खर्च होतात. यावर मार्ग काढण्यासाठी दरवर्षी कृत्रिम पावसाचे प्रयोग करणार आहे. यंदा कृत्रिम पावसासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुढील काळात अर्थसंकल्पात शंभर कोटींची तरतूद केली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. 

कृषिमंत्री म्हणाले, की राज्यातील ठाणे, कोल्हापूर विभागात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भाग, मराठवाडा व विदर्भात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यापुढील काळात कृत्रिम पावसासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण आहे की नाही, याची माहिती हवामान विभागाने शासनाला देणे गरजेचे आहे. दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस प्रयोगासाठी शासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यासाठी महाबळेश्‍वर, सोलापूर, नागपूर या तीन ठिकाणी रडारची व्यवस्था करण्यात आली आहे. येथून परिसरातील दोनशे किलोमीटर अंतरावर रडारच्या माध्यमातून सोडिअम क्लोराईची फवारणी करून ३० जुलैपूर्वी पाऊस पाडण्यात येईल.

पूर्वी अन्नधान्याचा दुष्काळ होता. आता पाण्याचा दुष्काळ आहे. पाणी हे सर्वस्व आहे. त्यामुळे पुढील काळात पाण्याच्या व्यवस्थापनावर भर देऊन पाणी वाचवावे लागणार आहे. परंतु दरवर्षी कमी पाऊस होत असल्याने दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. या दुष्काळावर दरवर्षी सरकारचे चार ते पाच हजार कोटी रुपये खर्च होतात. यावर मार्ग काढण्यासाठी दरवर्षी कृत्रिम पाऊस पाडल्यास पाण्याची उपलब्धता होईल.

कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पावसाच्या स्थितीवर आढावा बैठक पुण्यातील हवामान विभागात शुक्रवारी (ता. १९) पार पडली. या वेळी कृषिमंत्र्यांनी ही माहिती दिली. या वेळी हवामान विभागाचे प्रमुख डॉ. डी. एस. पै, कृषी आयुक्त सुहास दिवसे, हवामान विभागातील वैज्ञानिक डॉ. ए. के. श्रीवास्तव, डॉ. ओ. पी. श्रीजीत, यू. आर. जोशी, डॉ. कृपान घोष, डॉ. अनुपम कश्यपी, बाल सुब्रमण्यम, डॉ. ठाकूरदा, के. एन. मोहन, पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे आदी उपस्थित होते. 

पाच आॅगस्टला  कार्यशाळा घेणार 
दुबई, चीन येथेही कमी पाऊस पडतो. येथे दरवर्षी कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जातात. त्याच धर्तीवर राज्यातही कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्यातील चार संस्थांचे शास्त्रज्ञ आणि दुबई, चीन येथील शास्त्रज्ञ यांची एकत्रित कार्यशाळा पाच आॅगस्टला पुण्यात घेतली जाईल. 

कृषिमंत्री म्हणाले...

  •   सततच्या दुष्काळामुळे पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा लागणार 
  •   दुष्काळावर दरवर्षी सरकारचे चार ते पाच हजार कोटी रुपये खर्च
  •   यंदा कृत्रिम पावसासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद
  •   पुढील काळात अर्थसंकल्पात शंभर कोटींची तरतूद करणार
  •   मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, मराठवाडा व विदर्भात अत्यंत कमी पाऊस
  •   कृत्रिम पावसासाठी पोषक वातावरणाची माहिती हवामान विभागाने द्यावी
  •   महाबळेश्‍वर, सोलापूर, नागपूर या तीन ठिकाणी रडारची व्यवस्था 
  •   ३० जुलैपूर्वी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येईल

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...