agriculture news in Marathi, dr. anil Bonde says, government ready for re-sowing, pune, maharashtra | Agrowon

दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ. अनिल बोंडे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे. पुन्हा पावसाचा चांगला अंदाज वर्तविण्यात आला आहे. तरीही पाऊस न पडल्यास दुबार पेरणीची वेळ आल्यास शासन सक्षम आहे. दुबार पेरणीसाठी सोयाबीनचे सुमारे एक लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तसेच इतर पिकांचे बियाणे उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. 

पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे. पुन्हा पावसाचा चांगला अंदाज वर्तविण्यात आला आहे. तरीही पाऊस न पडल्यास दुबार पेरणीची वेळ आल्यास शासन सक्षम आहे. दुबार पेरणीसाठी सोयाबीनचे सुमारे एक लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तसेच इतर पिकांचे बियाणे उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. 

पुण्यातील कृषी आयुक्तालयात कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे कृषी विभागाची आढावा बैठक शुक्रवारी (ता. १९) घेण्यात आली. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कृषिमंत्री बोंडे यांनी ही माहिती दिली. या वेळी कृषी आयुक्त सुहास दिवसे उपस्थित होते. 

कृषिमंत्री बोंडे म्हणाले, की पीक विम्यामध्ये करारनाम्यामध्ये काय बदल करणे अपेक्षित आहे. या संदर्भात शेतकरी आणि विमा कंपन्या यांची कार्यशाळा घेतली आहे. त्यामध्ये पिकांचा जोखीम स्तर ७० टक्क्यांवरून ८० टक्क्यांपर्यंत नेला आहे. याशिवाय तालुका पातळीवर पीक विम्याचे प्रश्न सोडविण्यासाठी दक्षता समित्या नेमल्या आहेत. ज्या तालुक्यांमध्ये आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आहे, आणि शासन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे दुष्काळ घोषित झालेला आहे. अशा या तालुक्यांमध्ये उंबरठा उत्पन्न कमी होत असले तरी या तालुक्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी त्याचा पाठपुरावा सुरू आहे. 

झिरो बजेट शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. त्यासाठी शासन कटिबद्ध आहे. गेल्या वर्षी २७०० हेक्टरवर फळबाग लागवड झाली होती. यंदा २८९९ हेक्टवर फळबाग लागवड अपेक्षित आहे.

तसेच गेल्या वर्षीच्या मृग बहारातील फळबाग योजनेतील नुकसान भरपाई शंभर टक्के दिली आहे. पीएम किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांची माहितीचा डेटा अपलोड केला गेलेला आहे. या शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान योजनेच्या प्रमाणे दोन हप्त्यामध्ये चार हजार रुपये निश्चितपणे त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. 

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...