महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आ
ताज्या घडामोडी
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह विभागात : कृषिमंत्र डाॅ. बोंडे
नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतो. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्याचाच ढिसाळपणा पुढे आला आहे. बीटी ३ आणि फवारणीमुळे झालेल्या विषबाधेची चौकशी अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे रखडली असून अधिकारी देण्यासाठी गृह विभागाला विनंती करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी गुरुवारी (ता. १९) पत्रकार परिषदेत दिली.

वर्ष २०१७ मध्ये यवतमाळ, अमरावती, अकोला आणि इतर काही जिल्ह्यांत बीटी ३ ची लागवड शेतकऱ्यांनी केली. फवारणी करताना अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाली. यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. हा विषय चांगलाच गाजला होता. न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदतही देण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीकरिता एसआयटी स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांत मात्र चौकशी झाली नाही.
कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले, की नियमानुसार चौकशी अधिकारी गृह खात्याचा व्यक्ती असणे आवश्यक आहे. प्रथम एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. नंतर त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. आता त्यांच्या जागी नव्याने अधिकाऱ्याची नियुक्ती करायची आहे. अधिकारी देण्यासाठी गृह विभागाकडे फाइल पाठविण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांच्याकडे यावर निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे चौकशीच पूर्ण झाली नसल्याची कबुली कृषिमंत्री बोंडे यांनी दिली. यावर्षी फवारणीमुळे अकोला आणि यवतमाळमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
- 1 of 583
- ››