agriculture news in Marathi, Dr. Anil Bonde says, inquiry file of poisoning stuck in home ministry , Maharashtra | Page 2 ||| Agrowon

विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह विभागात : कृषिमंत्र डाॅ. बोंडे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतो. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्याचाच ढिसाळपणा पुढे आला आहे. बीटी ३ आणि फवारणीमुळे झालेल्या विषबाधेची चौकशी अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे रखडली असून अधिकारी देण्यासाठी गृह विभागाला विनंती करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी गुरुवारी (ता. १९) पत्रकार परिषदेत दिली.

नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतो. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्याचाच ढिसाळपणा पुढे आला आहे. बीटी ३ आणि फवारणीमुळे झालेल्या विषबाधेची चौकशी अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे रखडली असून अधिकारी देण्यासाठी गृह विभागाला विनंती करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी गुरुवारी (ता. १९) पत्रकार परिषदेत दिली.

वर्ष २०१७ मध्ये यवतमाळ, अमरावती, अकोला आणि इतर काही जिल्ह्यांत बीटी ३ ची लागवड शेतकऱ्यांनी केली. फवारणी करताना अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाली. यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. हा विषय चांगलाच गाजला होता. न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदतही देण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीकरिता एसआयटी स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांत मात्र चौकशी झाली नाही.

कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले, की नियमानुसार चौकशी अधिकारी गृह खात्याचा व्यक्ती असणे आवश्‍यक आहे. प्रथम एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. नंतर त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. आता त्यांच्या जागी नव्याने अधिकाऱ्याची नियुक्ती करायची आहे. अधिकारी देण्यासाठी गृह विभागाकडे फाइल पाठविण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांच्याकडे यावर निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे चौकशीच पूर्ण झाली नसल्याची कबुली कृषिमंत्री बोंडे यांनी दिली. यावर्षी फवारणीमुळे अकोला आणि यवतमाळमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...
विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाकयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या...
‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीरभुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...