agriculture news in Marathi, Dr. Anil Bonde says, sowing more than 50 percent area, Maharashtra | Agrowon

पेरणीने ओलांडली पन्नाशीः डाॅ. अनिल बोंडे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जुलै 2019

मुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर क्षेत्रावर (५४ टक्के) पेरणी झाली असून ९२ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. १७ जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून, सात जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.

कृषिमंत्री म्हणाले, की राज्यात १२ जुलैपर्यंत ३७९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. राज्याच्या ३५५ तालुक्यांपैकी २८ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के, १३७ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के, ९८ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के आणि ९२ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

मुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर क्षेत्रावर (५४ टक्के) पेरणी झाली असून ९२ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. १७ जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून, सात जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.

कृषिमंत्री म्हणाले, की राज्यात १२ जुलैपर्यंत ३७९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. राज्याच्या ३५५ तालुक्यांपैकी २८ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के, १३७ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के, ९८ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के आणि ९२ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर क्षेत्र असून ८०.६१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कोकण व पुणे विभागात अनुक्रमे ३६ हजार ३५५.२९ हेक्टर तर ४ हजार ९२९.०७ हेक्टर क्षेत्रावर भात रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली आहेत. कोकण विभागात ४७ तालुक्यांपैकी २ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. कोकण विभागात ४.६१ लाख हेक्टर खरिपाच्या क्षेत्रापैकी १.१९ लाख हेक्टर (२६ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 

राज्यात पुणे व लातूर विभागात काही ठिकाणी पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्यकता आहे. ठाणे, पालघर, रायगड, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १०० टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, गोंदिया आणि चंद्रपूर या १० जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. नाशिक विभागात ४० तालुक्यांपैकी ४ तालुक्यांत २५ ते ५० टक्के, १६ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के, ११ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के तर ९ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस. 

कृषिमंत्री म्हणाले....

  • नाशिक विभागात खरिपाची ६४ टक्के पेरणी. २१.३१ लाख हेक्टरपैकी १३.५४ लाख हेक्टरवर पेरणी
  • पुणे विभागात खरिपाची ४० टक्के पेरणी. ७.११ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २.८५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरा
  • कोल्हापूर विभागात ८.१६ लाख हेक्टरपैकी ४.०५ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ५० टक्के पेरणी
  • औरंगाबाद विभागात खरिपाचे २०.१५ लाख हेक्टर असून १४.४५ लाख हेक्टर क्षेत्रावर (७२ टक्के) पेरणी 
  • लातूर विभागात २७.८७ लाख हेक्टरपैकी १२.५९ लाख हेक्टरवर (४५ टक्के) पेरणी
  • अमरावती विभागात ३२.३१ लाख हेक्टर क्षेत्र खरिपाचे असून २३.७७ लाख हेक्टर क्षेत्रावर (७४ टक्के) पेरा
  • नागपूर विभागात १९.१८ लाख हेक्टरपैकी ७.८८ लाख हेक्टर क्षेत्रावर (४१ टक्के) पेरणी

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...