agriculture news in Marathi, Dr. Anil Bonde says, will help to Agriculture university, but not compromise with education, Maharashtra | Agrowon

कृषी विद्यापीठांना मदत करू; पण गुणवत्तेत तडजोड नको : अनिल बोंडे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जुलै 2019

पुणे: कृषी विद्यापीठांमधील अडचणी सोडविण्यासाठी शासन तयार आहे. मात्र शिक्षण देताना गुणवत्तेत अजिबात तडजोड करू नका, अशी सूचना कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली. 

विद्यापीठांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. साडेचार तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत कृषिमंत्र्यांनी विद्यापीठांची बारकाईने माहिती घेतली. “विद्यापीठांना मनुष्यबळ कमी पडत असल्यास कंत्राटी पद्धतीचा वापर करावा. त्यासाठी शासन मदत करेल. 

पुणे: कृषी विद्यापीठांमधील अडचणी सोडविण्यासाठी शासन तयार आहे. मात्र शिक्षण देताना गुणवत्तेत अजिबात तडजोड करू नका, अशी सूचना कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली. 

विद्यापीठांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. साडेचार तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत कृषिमंत्र्यांनी विद्यापीठांची बारकाईने माहिती घेतली. “विद्यापीठांना मनुष्यबळ कमी पडत असल्यास कंत्राटी पद्धतीचा वापर करावा. त्यासाठी शासन मदत करेल. 

 विद्यापीठांना परिषद किंवा शासन स्तरावरून काही मान्यता हवी असल्यास तसे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. यापूर्वीचे मुद्दे अजून प्रलंबित न ठेवता त्रुटींची पूर्तता करून शासनाला सादर करा,” असे ते म्हणाले. विद्यापीठांमधील कंत्राटी तसेच रोजंदारी मजुरांना कायम करण्याबाबत सध्या सुरू असलेल्या वादाची सविस्तर माहिती बैठकीत सादर करण्यात आली.

सातवा वेतन आयोग अद्यापही लागू न झाल्यामुळे कर्मचारी नाराज असल्याचा मुद्दा विद्यापीठांनी उपस्थित केला. “विद्यापीठे वेळेत माहिती सादर करीत नसतील तर त्याला काय इलाज आहे, तुम्हाला तुमच्याच पगाराची काळजी नाही का,” असे सवाल कृषिमंत्र्यांनी केले. वेतन आयोगाचा मुद्दा शासनाकडून वेळेत निकाली काढला जाईल, असा दिलासादेखील त्यांनी दिला. 

कृषी शिक्षण बळकटीकरणासाठी विविध श्रेणींतील पदनिर्मिती तसेच बांधकाम उभारणीचे प्रस्ताव शासनाकडे लवकर पाठविण्याच्या सूचनाही विद्यापीठांना देण्यात आल्या. दरम्यान, आपत्कालीन स्थितीत कामे करण्याबाबत कुलगुरूंना असलेले तीन लाखापर्यंतच्या खर्चाचे अधिकार २५ लाख रुपये करण्याचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. कुलगुरूंना किमान दहा लाखांपर्यंतचे खर्च करण्याचे अधिकार देण्याबाबत शासनाकडून हालचाली होण्याची शक्यता आहे. 

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले या वेळी उपस्थित होते.  

कृषिमंत्री म्हणाले...

  • विद्यापीठांना पगाराची काळजी नाही का? माहिती वेळेत सादर करा
  • वेतन आयोगाचा मुद्दा शासनाकडून वेळेत निकाली निघेल
  • मनुष्यबळ कमी पडत असल्यास कंत्राटी पद्धतीचा अवलंब करा
  • विविध श्रेणींतील पदनिर्मितीचे प्रस्ताव लवकरच सादर करा

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळी भागातील ‘श्रीमंत’ साकूर आसपास सर्वत्र दुष्काळी परिसर असताना सुशिक्षित व...
पांढऱ्या सोन्याचे काळे वास्तवकेंद्र सरकारने जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरीप...
‘जीआय’ला प्रोत्साहन राज्यासाठी वरदानकेंद्र सरकारचा २०१९ चा अंतिम अर्थसंकल्प   ...
कृत्रिम पावसाचा मंगळवारी तीन ठिकाणी...मुंबई   ः पश्चिम महाराष्ट्रातील...
क्षारप्रतिकारक ऊस वाणावर होणार संशोधनपुणे  : भाभा अणुशक्ती केंद्र (बीआरसी) आणि...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची...पुणे  : बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (...
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...