agriculture news in Marathi, Dr. Anil Kakodkar says, give support of new technology for animal treatment, Maharashtra | Agrowon

पारंपरिक पशू उपचाराला नवतंत्राची जोड द्या: डाॅ. काकोडकर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 मार्च 2019

पुणे ः ग्रामीण भागात आजही जनावरांच्या उपचारासाठी स्थानिक वैदूंची मदत घेतली जाते. औषधी वनस्पतींद्वारे करण्यात येणारे उपचार चांगले आहेत. या पारंपरिक उपचार पद्धतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड दिली तर उपचार पद्धतीत सुधारणा होईल. त्याचे प्रमाणीकरण होईल, त्याचबरोबरीने ही उपचार पद्धती सर्वांना उपयुक्त ठरेल, असा सल्ला राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी दिला. 

पुणे ः ग्रामीण भागात आजही जनावरांच्या उपचारासाठी स्थानिक वैदूंची मदत घेतली जाते. औषधी वनस्पतींद्वारे करण्यात येणारे उपचार चांगले आहेत. या पारंपरिक उपचार पद्धतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड दिली तर उपचार पद्धतीत सुधारणा होईल. त्याचे प्रमाणीकरण होईल, त्याचबरोबरीने ही उपचार पद्धती सर्वांना उपयुक्त ठरेल, असा सल्ला राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी दिला. 

 बाएफ संस्था आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक पशू औषधी उपचाराची सद्यस्थिती, संधी आणि आव्हाने याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख  पाहूणे म्हणून डॉ. अनिल काकोडकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे सचीव डॉ. अरुण सप्रे, बाएफचे अध्यक्ष गिरीश सोहनी तसेच भरत काकडे, डॉ. अशोक पांडे आणि विविध राज्यांतील पशुतज्ज्ञ उपस्थित होते.

 डॉ. काकोडकर म्हणाले, की पारंपरिक उपचार पद्धतींचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्यांचे प्रमाणीकरण करावे. यासाठी ग्रामीण भागात जनावरांवर उपचार करणारे वैदू तसेच पशुतज्ज्ञांच्या समन्वयातून पशू उपचार पद्धतीमध्ये औषधी वनस्पतींचा वापर योग्य पद्धतीने करणे शक्य आहे. यातून स्थानिक पातळीवर कमी खर्चात योग्य उपचार करणे शक्य होईल. परंपरागत उपचार पद्धतींविषयी जगभरातील तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. यातून नवीन औषधे विकसित होत आहेत. आपणही नवीन तंत्रज्ञानाची जोड परंपरागत उपचार पद्धतीला दिली पाहिजे. 

उपस्थितांना मार्गदर्शन करताना गिरीश सोहनी म्हणाले, की आपल्या देशात  पुरातन काळापासून उपचारासाठी औषधी वनस्पतींचा वापर होत आहे. त्यातून आयुर्वेद, युनानी पद्धती विकसित झाल्या. याचबरोबरीने आजही ग्रामीण भागात औषधी वनस्पतींच्या पशू उपचारासाठी वापर करणारे वैदू आहेत. त्यांच्याकडे असलेल्या परंपरागत ज्ञानाचे संकलन आणि अभ्यास करण्यासाठी बाएफने उपक्रम हाती घेतला आहे.

वैदू आणि पशुतज्ज्ञांच्या समन्वयातून पशू उपचार पद्धतीचे प्रमाणीकरणही केले आहे. या किफायतशीर उपचार पद्धतीचा फायदाही होताना दिसतो. परंपरागत ज्ञान आणि आधुनिक पशू उपचार पद्धतीची सांगड घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कार्यशाळेमध्ये विविध राज्यातील पशूतज्ज्ञांनी पशू उपचार पद्धतीविषयी अनुभव मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आवारे यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...
साताऱ्यातील धरणांमध्ये ९८ टक्‍क्‍यांवर...सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
नियोजनशून्य कारभारामुळे ६० टक्केच निधी...मुंबई ः भाजप-शिवसेना युती सरकारची पाच वर्षांतील...