agriculture news in Marathi Dr. Ashok dalwai says agriculture economists has important role in food security Maharashtra | Agrowon

अन्न सुरक्षेत कृषी अर्थशास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची : डॅा.अशोक दलवाई

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 डिसेंबर 2019

परभणी : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बाजार व्यवस्था कार्यक्षम करण्यासोबतच शेतमालाच्या नासाडीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी काढणी पश्चात व्यवस्थापन यंत्रणेचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जात आहे. अन्न सुरक्षा उत्पन्नाच्या सुरक्षितेत परावर्तित करून येत्या काळात शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये कृषी अर्थशास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा शेतकऱ्यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे समितीचे अध्‍यक्ष डॉ.

परभणी : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बाजार व्यवस्था कार्यक्षम करण्यासोबतच शेतमालाच्या नासाडीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी काढणी पश्चात व्यवस्थापन यंत्रणेचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जात आहे. अन्न सुरक्षा उत्पन्नाच्या सुरक्षितेत परावर्तित करून येत्या काळात शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये कृषी अर्थशास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा शेतकऱ्यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे समितीचे अध्‍यक्ष डॉ. अशोक दलवाई यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्‍त्र विभाग आणि महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍था यांच्‍यातर्फे शनिवार (ता. २१) ते रविवार (ता. २२) या कालावधीत परभणी येथे आयोजित २२ व्या राष्‍ट्रीय परिषदेचेचे उद्‌घाटन शनिवारी (ता. २१) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहामध्ये झाले. या वेळी शेतकऱ्यांसाठी शेती या विषयावर डॉ. दलवाई यांचे बीजभाषण झाले.

कुलगुरू डॉ. अशोक ढवण अध्यक्षस्थानी होते. राज्‍य कृषिमूल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष पाशा पटेल, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. किशोर देशमुख, मुख्‍य आयोजक डॉ. दिगंबर पेरके, महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ. प्रकाश महिंद्रे, महाबीजचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. एस. डी. वानखेडे आदी उपस्थित होते. 

डॉ. दलवाई पुढे म्हणाले, की शेतीसाठी माती आणि पाणी हे महत्त्वपूर्ण घटक आहेत. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी या नैसर्गिक संसाधनाचा कार्यक्षम उपयोग करावा लागेल. पैदासकाराच्या प्रयत्नांमुळे अन्नधान्यात स्वंयपूर्णता आली. परंतु, काढणी पश्चात शेतमालाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे हे नुकसान कमी करण्यासाठी साठवणूक व्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसेच जवळची बाजार पेठेत शेतमाल विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी निविष्ठावरील खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती पध्दतीला प्रोत्साहन दिले जात आहे. उत्पादन केंद्रित शेतीवरून उत्पन्न केंद्रित शेती यावर भर दिला जात आहे. 

पाशा पटेल म्हणाले, की हवामान बदलामुळे शेती व्यवसायापुढे मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. डॉ. ढवण म्हणाले, की अन्न सुरक्षा आणि जमिनीची सुरक्षा यांची सांगड घालूनच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठाने सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी शेती पध्दतीचे मॅाडेल विकसित केले आहेत. डॉ. देशमुख, डॅा. गोखले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. महिंद्रे यांनी संस्थेचा कार्यअहवाल सादर केला. सूत्रसंचालन डॉ. आर. व्ही. चव्हाण केले तर आभार पेरके यांनी मानले. 

या दोन दिवसीय परिषदेमध्ये देशातील तसेच राज्‍यातील शंभरपेक्षा जास्‍त कृषी शास्‍त्रज्ञ सहभागी झाले आहेत. सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे, कृषी विकासाचे सामाजिक-आर्थिक मानके, सुधारित कृषी तंत्रज्ञानाचा परिणाम, कृषी विपणन धोरण, शेतमाल मूल्‍य धोरण आदी विषयांवर सहभागी शास्‍त्रज्ञ संशोधन लेखांचे सादरीकरण करणार आहेत. रविवारी (ता. २२) या परिषदेचा समारोप हैदराबाद येथील राष्‍ट्रीय कृषी विस्‍तार व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे (मॅनेज) संचालक डॉ. के. सी. गुम्‍मागोलमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत. या वेळी डॉ. गुम्‍मागोलमठ यांचे भारतीय शेतमाल बाजारपेठ सुधारणा यावर व्‍याख्‍यान होणार आहे. 


इतर अॅग्रोमनी
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...