agriculture news in marathi, Dr. Babasaheb Ambedkar Jayanti | Agrowon

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यभरात अभिवादन
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 एप्रिल 2018

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. या वेळी शिक्षणमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राज पुरोहित, भाई गिरकर उपस्थित होते.

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. या वेळी शिक्षणमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार राज पुरोहित, भाई गिरकर उपस्थित होते.

मुंबई महापालिकेच्या वतीने चैत्यभूमी येथे आदरांजली कार्यक्रमाचे शनिवारी (ता. १४) आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या छायाचित्र प्रदर्शनासही राज्यपालांनी भेट दिली. महापालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्मारक समितीचे अध्यक्ष महेंद्र साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विधान भवनातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास विधान परिषद सदस्या श्रीमती हुस्नबानू खलिफे व विधानसभेचे माजी सदस्य मधू चव्हाण, तर मंत्रालयात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सामाजिक न्याय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी मुख्य सचिव सुमीत मल्लिक, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव महेश झगडे आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...