दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
बातम्या
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ. बसवराज खादी
परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत. उत्पादनात बीटी कपाशीपेक्षा सरस आहेत. देशी कपाशीचे सघन लागवड पद्धतीने बीटी कपाशीपेक्षा जास्त उत्पादन शक्य आहे. कापड उद्योगात देशी कापसाला मागणी आहे, त्यामुळे भविष्यात देशी कपाशीला मागणी राहिल्याने निश्चित गतवैभव प्राप्त होईल. परंतु या वाणांच्या कापसाच्या वेचणीसाठी यंत्र विकसित करणेदेखील आवश्यक आहे, असे प्रतिपादन नागपूर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. बसवराज खादी यांनी केले.
परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत. उत्पादनात बीटी कपाशीपेक्षा सरस आहेत. देशी कपाशीचे सघन लागवड पद्धतीने बीटी कपाशीपेक्षा जास्त उत्पादन शक्य आहे. कापड उद्योगात देशी कापसाला मागणी आहे, त्यामुळे भविष्यात देशी कपाशीला मागणी राहिल्याने निश्चित गतवैभव प्राप्त होईल. परंतु या वाणांच्या कापसाच्या वेचणीसाठी यंत्र विकसित करणेदेखील आवश्यक आहे, असे प्रतिपादन नागपूर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. बसवराज खादी यांनी केले.
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील महेबूब बाग कापूस संशोधन केंद्राच्या शताब्दीपूर्ती सोहळा कार्यक्रमामध्ये शनिवारी (ता. ७) डॉ. खादी बोलत होते. कुलगुरू डॉ. अशोक ढवण अध्यस्थानी होते. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील माजी संचालक संशोधन डॉ. दत्तात्रेय बापट, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे कार्यकारी परिषद सदस्य डॉ. सुभाष बोरीकर, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, माजी कापूस पैदासकार डॉ. सुबराव माने, कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार चिंचाणे, महाबीजचे व्यवस्थापक प्रफुल्ल लहाने, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले आदी उपस्थित होते.
डॉ. खादी पुढे म्हणाले, की शताब्दीपूर्ती करणाऱ्या सुरत, हुबळी येथील केंद्रांनंतर महेबूब देशी कापूस संशोधन केंद्र हे देशातील तिसरे केंद्र आहे. लांब धाग्याचे देशी कपाशीचे वाण विकसित करण्यात या केंद्राचे तत्कालीन पैदासकार डॉ. ललितादास देशपांडे यांचा सिंहाचा वाटा आहे.
डॉ. बापट म्हणाले, की शेतकऱ्यांची कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्नाची गरज आहे.
डॉ. बोरीकर म्हणाले, की देशी कपाशीच्या वाणांबाबत जगात परभणीचा नावलौकिक आहे. देशी वाणांच्या डीएनएचे जतन करणे आवश्यक आहे. डॉ. ढवण म्हणाले, की देशी कपाशीचा उत्पादन खर्च कमी आहे, त्यामुळे येत्या काळात लहान, मध्यम शेतकरी केंद्रस्थानी ठेवून देशी कपाशीवर संशोधन केले जाईल. कापड उद्योगात देशी कापसाला मागणी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उत्पादन खर्च किमान पातळीवर आणावा लागेल, त्यासाठी देशी कपाशीचा निश्चित उपयोग होईल.
या वेळी देशी कापूस संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ कापूस पैदासकार डॉ. एस. एस. माने, डॉ. खिजर बेग, डॉ. विजयकुमार चिंचाणे, डॉ. संतोष बोरगावकर, डॉ. अविनाश राठोड, तसेच सातत्याने देशी कपाशीच्या वाणांची लागवड करणारे शेतकरी वसंत फुटाणे (वर्धा), राहुल बोले (यवतमाळ), श्री. स्वामिनाथन (चेन्नई), नरेश शिंदे (सनपुरी, परभणी) यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी देशी कापूस लागवड व्यवस्थापन, देशी कापसापासून निर्मित कापडी पिशव्या, तसेच शताब्दीपूर्ती स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
प्रास्ताविक डॉ. वासकर यांनी केले. प्रा. अरविंद पंडागळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. चिंचाणे यांनी आभार मानले. या वेळी कृषी विद्यापीठ विकसित प्रसारित वाण, देशी कपाशीचे विविध प्रयोग, विविध वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम यांच्या प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी, शास्त्रज्ञ उपस्थित होते.
- 1 of 1505
- ››