agriculture news in Marathi, Dr. Bhale says, development of agriculture entrepreneurship, Maharashtra | Agrowon

कृषी उद्योजकता विकास महत्त्वाचाः डाॅ. भाले
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 जुलै 2019

अकोला ः कृषी उद्योजकता विकास अतिशय महत्त्वाचा असून कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांची यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. भविष्यात कृषीमध्ये हरित क्रांतीसाठी कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची, असे मत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी व्यक्त केले.

अकोला ः कृषी उद्योजकता विकास अतिशय महत्त्वाचा असून कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांची यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. भविष्यात कृषीमध्ये हरित क्रांतीसाठी कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची, असे मत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी व्यक्त केले.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात एकविसाव्या शतकामध्ये भारतीय अर्थव्यवस्था सबलीकरणामध्ये कृषी पदवीधरांची भूमिका या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. मायंदे, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाचे अध्यक्ष प्रकाश पोहरे उपस्थितीत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले होते. 

डॉ. मायंदे म्हणाले, दरवर्षी कृषिपदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्रात खूप जास्त असून राज्य देशामध्ये याबाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांनी कृषी उद्योग स्थापनेवर भर द्यावा व उद्योजक बनण्याच्या हेतूने वाटचाल करावी. म्हणजे यामुळे कृषी क्षेत्रात रोजगारनिर्मिती होईल. कृषी अभ्यासक्रमात जागतिकस्तरावरील कृषी तंत्रज्ञान विकासाचा आढावा घेऊन त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा व आवश्यक बदल करण्यात यावे. हे काम सद्य:स्थितीत दर दहा वर्षांनी होते पण ते दर एक ते दोन वर्षानी करण्यात यावे,’’ असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रकाश पोहरे यांनी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणेसाठी विदेशात भारतीय मालाची मागणी वाढवणे तसेच जास्तीत जास्त निर्यातीवर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या कार्यशाळेमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. आर. जी. नादर, डी. सी. गोखले, डॉ. व्ही. के. खर्चे, एस. बी. नानोटे यांनीही मनोगत मांडले. कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी सदर कार्यशाळेविषयी माहिती दिली.

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...
राज्यात नवे जलधोरणपुणे : राज्याच्या जुनाट जलधोरणाला अखेर मूठमाती...
कृषी विभाग उभारणार गाव पातळीवर शेतकरी...नागपूर ः ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायकांकरिता...
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
शेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...
कुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...