agriculture news in Marathi, Dr. bhale says, produce that witch has demand, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भाले

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

अकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना शेतकऱ्यांनी अधिक सजगतेने पेरणी करावी. हवामान खात्याने दिलेला अंदाज, आपल्या भागातील परिस्थिती याचा विचार करून योग्य पिकाची लागवड करावी. बाजारात जे विकते ते पिकविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी केले.
 

अकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना शेतकऱ्यांनी अधिक सजगतेने पेरणी करावी. हवामान खात्याने दिलेला अंदाज, आपल्या भागातील परिस्थिती याचा विचार करून योग्य पिकाची लागवड करावी. बाजारात जे विकते ते पिकविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी केले.
 

आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शुक्रवारी (ता. २४)  ‘खरीपपूर्व कृषी मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या वेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. भाले बोलत होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डाॅ. महेंद्र नागदेवे, उद्यानविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. पी. के. नागरे, विस्तार शिक्षण संचालनालयाचे डाॅ. काळे, प्रयोगशील शेतकरी तथा उद्योजक अप्पाजी गुंजकर (रा. उंद्री), शेतकरी विजय इंगळे (चितलवाडी) उपस्थित होते. 

डॉ. भाले पुढे म्हणाले, आज काळानुरूप शेती करण्याची गरज तयार झाली आहे. वातावरणात झालेले बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिकांची निवड करावी. विद्यापीठाचे बीटी कपाशी बियाणे या हंगामात महाबीजने उपलब्ध करून दिले आहे. त्याची लागवड करावी. कपाशीवर येणाऱ्या बोंड अळी तसेच इतर कीड-रोगांचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सजग राहावे. सोलर ट्रॅप, फेरोमोन ट्रॅपचा वापर केल्यास नियंत्रण मिळवू शकतो हे यापूर्वीच्या हंगामात दिसून आले. त्यामुळे विद्यापीठाचे कमी खर्चाचे व्यवस्थापन तंत्र वापरावे.

सध्या ज्वारीसारखे पीक चांगला पर्याय निर्माण झाला आहे. ज्वारीचे उत्पादन चांगले येते. शिवाय जनावरांसाठी चाराही मिळतो. आंतरपीक पद्धतीसुद्धा काळाची गरज बनली आहे. आपण जे पिकवतो त्यावर प्रक्रीया केली तर त्याचा दर अधिक मिळू शकतो. विविध पिकांचे पर्याय निर्माण झाले असून शेतकऱ्यांनी या पीक बदलाचाही विचार करणे काळ सुसंगत ठरेल, असेही डॉ. भाले म्हणाले.

मेळाव्यात इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत हंगामासाठी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यात शेतकऱ्यांना खरीप हंगामातील संभाव्य पाऊसमान, खरीप पिकांच्या जाती, नवीन संशोधित पीकपद्धती, आंतरपीक पद्धती, मृद व जलसंधारण व्यवस्थापन, एकीकृत कीड व रोग व्यवस्थापन, सुधारित अवजारे याबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांमार्फत देण्यात आली. मेळाव्याच्या ठिकाणी कृषी विद्यापीठाने तयार केलेले व उपलब्ध असलेले बी-बियाणे, जैविक खते, विद्यापीठ प्रकाशने, निविष्ठा शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. यासाठी शेतकऱ्यांनी सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी केली होती. 


इतर अॅग्रो विशेष
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...
राज्यात सर्वदूर हलका पाऊसपुणे ः राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम...
सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उच्चांकी...जॉर्जिया येथील व्होलदोस्ता प्रांतामधील रॅंडी...
शेतकऱ्यांचे वनौषधी अनुदान पुन्हा रखडलेपुणे: राज्यात वनौषधी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे...
दुर्गम शेतकऱ्यांसाठी जलकुंडे ठरली वरदानठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दुर्गम...