agriculture news in Marathi, Dr. Bonde says, committee for MAIDC empowerment, Maharashtra | Agrowon

एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी त्रिसदस्यीय समिती : कृषिमंत्री डॉ. बोंडे

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात येत असून, ही समिती महामंडळाच्या विकासासाठी सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करेल व त्यानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करावा, असे निर्देश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी या वेळी दिले.

मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात येत असून, ही समिती महामंडळाच्या विकासासाठी सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करेल व त्यानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करावा, असे निर्देश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी या वेळी दिले.

मंत्रालयात महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळा (एमएआयडीसी)च्या कामकाजाबद्दल कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खते, कीटकनाशके, कृषी अभियांत्रिकी, खाद्य प्रक्रिया व रिक्त पदे याबाबतचा आढावा घेण्यात आला. कृषिमंत्री डॉ. बोंडे म्हणाले, या त्रिसदस्यीय तज्ज्ञ समितीमध्ये निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, कृषी उद्योग क्षेत्रातील अनुभव असणारी व्यक्ती व कृषी अन्न व खाद्य प्रक्रियेतील अनुभवी व्यक्ती यांचा समावेश करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत संत्र, आंबा, अननस व टोमॅटो यांच्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थांचे उत्पादन केले जाते. या उत्पादनांना कॅन्टीन स्टोअर्स, एअर इंडिया, वेगवेगळ्या तारांकित हॉटेल्स, शासकीय संस्था तसेच खुल्या बाजारात प्रचंड मागणी आहे. त्याचबरोबर महामंडळामार्फत खते, कीटकनाशके यांसारखी कृषी उत्पादके व यंत्रसामग्री उत्तम दर्जात व वाजवी दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात. यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळवून देण्यासाठी व महामंडळाचा सार्वत्रिक विकास करण्यासाठी ही समिती नेमण्यात येणार असू,न त्याचा शेतकऱ्यांना व महामंडळाला नक्कीच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

बैठकीस महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक करंजकर, संचालक सी. आर. लोही तसेच कृषी विभागाचे व महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
`गोवर-रुबेला'त सोलापूर जिल्ह्यात...सोलापूर : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘गोवर-...
सांगली जिल्ह्यात शेत, पाणंद रस्त्यांचे...लेंगरे, जि. सांगली : शेत आणि पाणंद रस्त्यांचे...
पाणीवाटप संस्थेद्वारे मिळणार ‘ताकारी’चे...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ...
मका संशोधन केंद्राचे भिजत घोंगडेऔरंगाबाद : कार्यकारी परिषदेच्या ठरावानंतर...