agriculture news in Marathi, Dr. Chiplunkar says weed decompose for organic manure, Maharashtra | Agrowon

सेंद्रिय पदार्थवाढीसाठी तण वाढवा, शेतातच कुजवा : डॉ. चिपळूणकर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 जानेवारी 2018

डाळींब संघ अधीवेशन
पुणे ः जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढण्यासाठी पिकांची मुळे, खोड जमिनतीच कुजवा, विशेषतः तण वाढवा, तणनाशकाने ती मारा आणि तीच जमिनीत पुन्हा कुजू द्या. त्याचा मोठा फायदा जमिनीतील सामू नियंत्रणासाठी आणि सेंद्रिय कर्बवाढीसाठी उपयुक्त ठरू शकतो, असे शेतीतज्ज्ञ प्र. र. चिपळूणकर यांनी रविवारी (ता. ७) येथे सांगितले. 

डाळींब संघ अधीवेशन
पुणे ः जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढण्यासाठी पिकांची मुळे, खोड जमिनतीच कुजवा, विशेषतः तण वाढवा, तणनाशकाने ती मारा आणि तीच जमिनीत पुन्हा कुजू द्या. त्याचा मोठा फायदा जमिनीतील सामू नियंत्रणासाठी आणि सेंद्रिय कर्बवाढीसाठी उपयुक्त ठरू शकतो, असे शेतीतज्ज्ञ प्र. र. चिपळूणकर यांनी रविवारी (ता. ७) येथे सांगितले. 

अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या वतीने आयोजित डाळिंब परिसंवादात ‘जमिनीची सुपीकता व पिकाचा दर्जा वाढवणे’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्सना शर्मा, प्रा. नीलेश गायकवाड आदी उपस्थित होते.

श्री. चिपळूणकर म्हणाले, की सेंद्रिय पदार्थाची टक्केवारी वाढवणे आवश्‍यक आहे. आज तेच एक आव्हान आहे. सेंद्रिय पदार्थ कुजणे आणि सेंद्रिय पदार्थांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. त्याशिवाय जमिनीची निचरा शक्ती वाढत नाही. त्यासाठी पिकाच्या पेरणीपासूनच योग्य पद्धतीने नियोजन केल्यास मार्ग मिळेल. जमिनीचा सामू रासायनिक खतामुळे वाढला, असा दोष सातत्याने दिला जातो. पण हे बरोबर नाही, तर चुकीचे सेंद्रिय पदार्थांचे व्यवस्थापन हे त्यामागचे कारण आहे. 

आम्ही उसाचे पाचट कुजवण्याचा प्रयोग केला, पण त्याचा तेवढा उपयोग झाला नाही, पण त्याऐवजी ऊस काढल्यानंतर त्याची मुळे, खोडे कुजवली, त्याचा चांगला फायदा झाला. तसेच या वेळी त्यांनी सेंद्रिय पदार्थांचा वापर, उपयोग या अनुषंगाने विविध माहिती दिली. 

इतर अॅग्रो विशेष
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
कृषिसेवक भरती प्रक्रियेवरील बंदी...अकोला ः कृषी खात्याने १४१६ जागांसाठी राबवलेल्या...
यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची...पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या...
पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४...मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक...पुणे  : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या...
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...
विषबाधेबाबत गांभीर्य कधी?घटना क्रमांक १ ः तारीख - ४ मे २०१९, ठिकाण -...
समवर्ती लेखापरीक्षणातूनच टळतील...इ.स. पूर्व सहाव्या शतकापूर्वी प्राचीन इजिप्शियन...
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून...नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील...
आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...