देशात शेतकऱ्यांचा विकास प्राधान्याने व्हावा ः डॉ. दलवाई

सकाळ वर्धापन दिन
सकाळ वर्धापन दिन

नाशिक : देशातील ६० कोटी लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून, शेतकऱ्यांचा विकास प्राधान्याने व्हायला हवा, तरच देशाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन नवी दिल्लीच्या राष्ट्रीय अवर्षण प्रवणक्षेत्र प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांनी केले.  सकाळच्या नाशिक आवृत्तीच्या ३० व्या वर्धापनदिनानिमित्त कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित ‘शेतकरी उत्पादक कंपन्यांपुढील संधी आणि आव्हाने' या विषयावर मंगळवारी (ता.५) मार्गदर्शन करताना ते बोलत होते. डॉ. दलवाई म्हणाले की आज प्रत्येकजण उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील आहे, मात्र मार्केटिंगचे काय? शेती हा एक व्यवसाय आहे. कृषिक्षेत्राकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघायला हवे. जगातील पहिला उद्योजक हा शेतकरी आहे. जागतिक स्पर्धेत भारतीय शेतकरी मागे आहे. हवामान, बाजारभाव, नवीन तंत्रज्ञान या गोष्टी समजून घेण्यात तो मागे पडतो. पण त्याने तंत्रज्ञान अवगत करून घेणे गरजेचे आहे. उत्पादनाबरोबर काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा अवलंब गरजेचा आहे.  ‘‘जागतिक मागणीचा प्रत्येकाने अभ्यास करावा. कृषिक्षेत्राच्या क्षितीजाचा विस्तार उद्योग, ऊर्जा, प्रक्रिया क्षेत्राला जोडून करावा. शेतकरी कंपन्या आणि करार शेतीची सांगड घालावी आणि विपणन व प्रक्रियेला सामूहिक शेतीतून चालना द्यावी. शेतीला मूल्य साखळीमध्ये रूपांतरित करावे लागेल. त्यादृष्टीने कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना विचार आणि संशोधन करावे लागेल. शेतकरी कंपन्या आणि करार शेतीची सांगड घालत उत्पादन खर्च कमी करावा लागेल,’’ असे सांगत डॉ. दलवाई यांनी १० वर्षांत ७० लाख शेतकरी कंपन्या उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाप्रसंगी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संपादक-संचालक श्रीराम पवार, उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने हे उपस्थित होते. या वेळी श्री. प्रतापराव पवार यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीराम पवार यांनी आभार मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com