कोरडवाहू फळ संशोधन कार्याला गती देण्याची गरज ः डाॅ. धिल्लन

फळ संशोदन परिषद
फळ संशोदन परिषद

परभणी: पोषण मूल्यांच्या सुरक्षिततेसाठी आहारातील फळांचा समावेश महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता फळपिकांमध्ये आहे. कोरडवाहू फळांच्या संशोधन कार्याला गती द्यावी लागणार आहे. उद्यानविद्या शास्त्रज्ञांनी संशोधनासोबतच विस्तार कार्यदेखील करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक महासंचालक (उद्यानविद्या) डॅा. डब्लू. एस. धिल्लन यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत बिकानेर (राजस्थान) येथील कोरडवाहू मध्यवर्ती संशोधन संस्था यांच्यातर्फे परभणी येथे शनिवार (ता. २३) ते सोमवार (ता. २५) या कालावधीत आयोजित कोरडवाहू फळे संशोधन राष्ट्रीय वार्षिक कार्यशाळेच्या उद्‌घाटन कार्यक्रमामध्ये शनिवारी (ता. २३) डॅा. धिल्लन बोलत होते. वनामकृविचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण अध्यक्षस्थानी होते. बिकानेर येथील कोरडवाहू फळे संशोधन संस्थेचे संचालक तथा प्रकल्प समन्वयक डॉ. बी. डी. शर्मा, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे, ‘वनामकृवि’चे संशोधन संचालक डॅा. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॅा. प्रदीप इंगोले, कुलसचिव रणजित पाटील, फळसंशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॅा. विश्वनाथ खंदारे, अंबाजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॅा. जी. आर. मुंढे, कृषी भूषण कांतराव देशमुख आदीची उपस्थिती होती. डॅा. धिल्लन पुढे म्हणाले, आपल्याला अन्नधान्याची सुरक्षितता मिळाली. देशातील ६० टक्के शाकाहारी लोकसंख्येच्या पोषण मूल्यांच्या सुरक्षितेसाठी फळांच्या आहारातील वापरावर भर द्यावा लागणार आहे. दर्जेदार फलोत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. काढणी पश्चात मोठ्या प्रमाणात होणारी नासाडी थांबविण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे लागेल. दुष्काळात तग धरणाऱ्या कोरडवाहू फळ पिकांचे खुंट शोधावे लागणार आहे. डॅा. मोरे म्हणाले, कोरडवाहू फलोत्पादनातून दुसरी हरितक्रांती शक्य होईल त्यासाठी मॅाडेल विकसित करावे लागेल. डाॅ. ढवण म्हणाले, मराठवाड्यातील कोरडवाहू बहुल क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच रोजगारनिर्मितीसाठी फलोत्पादन आवश्यक आहे. शेतकऱ्यांना कोरडवाहू फळपिकांची दर्जेदार रोपटी तसेच काढणी पश्चात तंत्रज्ञान देण्यासाठी विशेष भर देण्याची गरज आहे.  डॅा. वासकर यांनी प्रास्ताविक केले. डॅा. विणा भालेराव यांनी सूत्रसंचालन केले, तर डॅा. खंदारे यांनी आभार मानले. या कार्यशाळेत देशातील कोरडवाहू फळे संशोधनाशी निगडित ७० हून जास्‍त शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. विविध तांत्रिक चर्चासत्रात संशोधनाचे निष्कर्ष सादर करण्यात येणार असून वर्षभरातील संशोधन कार्याचा आढावा तसेच पुढील संशोधनाची दिशा निश्चित करण्‍यात येणार आहे.  महासंचालक (उद्यानविद्या) डॅा. डब्लू. एस. धिल्लन. या वेळी उपस्थित कुलगुरू डाॅ. अशोक ढवण, माजी कुलगुरू डाॅ. टी. ए. मोरे, संशोधन संचालक डॅा. दत्तप्रसाद वासकर, डॅा. बी. डी. शर्मा, डॅा. विश्वनाथ खंदारे, डॅा. जी. आर. मुंढे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com