agriculture news in Marathi, Dr. Fuke says, now ethanol from weed, Maharashtra | Agrowon

आता तणसापासून होणार इथेनॉल उत्पादन : डॉ. फुके

टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जुलै 2019

भंडारा ः तणसापासून इथेनॉल निर्मिती प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्णत्वास येणार आहे. तब्बल १५०० कोटी रुपयांची तरतूद त्याकरिता करण्यात आली असून शेतीवेस्ट म्हटल्या जाणाऱ्या तणसाचे या माध्यमातून मूल्यवर्धन होईल, असा विश्‍वास पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी व्यक्‍त केला. 

तणसापासून इथेनॉल व सीएनजी निर्मिती प्रकल्पाकरिता जागेची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी विलास ठाकरे, जे. बी. संगीतराव, कार्यकारी अभियंता डी. एन. नंदनवार, तहसीलदार अक्षय पोयाम, बीपीसीएलचे संजीव पोळ या वेळी उपस्थित होते. 

भंडारा ः तणसापासून इथेनॉल निर्मिती प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्णत्वास येणार आहे. तब्बल १५०० कोटी रुपयांची तरतूद त्याकरिता करण्यात आली असून शेतीवेस्ट म्हटल्या जाणाऱ्या तणसाचे या माध्यमातून मूल्यवर्धन होईल, असा विश्‍वास पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी व्यक्‍त केला. 

तणसापासून इथेनॉल व सीएनजी निर्मिती प्रकल्पाकरिता जागेची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी विलास ठाकरे, जे. बी. संगीतराव, कार्यकारी अभियंता डी. एन. नंदनवार, तहसीलदार अक्षय पोयाम, बीपीसीएलचे संजीव पोळ या वेळी उपस्थित होते. 

डॉ. परिणय फुके म्हणाले, ‘‘मकरधोकडा येथे शासनाच्या १४६.७ हेक्‍टरपैकी ४७.७५ हेक्‍टरवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील १० ते १५ हजार युवक, युवतींना या ठिकाणी रोजगार प्राप्त होईल. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील तब्बल २ ते ३ लाख टन तणस या प्रकल्पासाठी लागणार आहे. यातून शेतकऱ्यांना सात ते आठ हजार रुपये हेक्‍टरी मोबदला मिळू शकतो. त्यामुळे धानाचे तणस या पुढे शेतकऱ्यांनी जाळू नये. हा प्रकल्प १५०० कोटीचा असून १०० एकर जमीन त्याकरीता लागणार आहे. अधिकची जमीन मागणी करणे व उपलब्ध करुन देणे याबाबत सूचना देण्यात आल्या असून एम.आय.डी.सी. त्याकरीता सहकार्य करेल.

या स्वरुपाचे भारतात १२ प्रकल्प उभारण्यात येत असून कार्यान्वीत होत आहेत. ३.८४ लाख टन तणस भंडारा जिल्हयात तर गोंदिया जिल्हयात ३.४६ लाख टन तणस उपलब्ध आहे. हे सर्व जाळल्या जात असून आता त्यापासून इथेनॉल व गॅसची निर्मिती होईल.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...