गुण नियंत्रण कायदे प्रशिक्षणात काम करणार ः डॉ. लोकरे

लोकरे
लोकरे

पुणे: कृषी खात्यातील अभ्यासू अधिकारी म्हणून लौकिक असलेले डॉ. रामचंद्र लोकरे यांनी निवृत्तीनंतर गुण नियंत्रण कायद्याच्या प्रशिक्षणासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यपालांनी त्यांना अलीकडेच कृषी सेवारत्न पुरस्काराने गौरविले होते.  कृषी खात्याच्या गळीत व तृणधान्य विभागाचे उपसंचालक असलेले डॉ. लोकरे हे मुख्यतः गुण नियंत्रण कायद्यातील निष्णात अधिकारी समजले जात होते. गुण नियंत्रण विभागात काम करीत असताना त्यांच्या अनुभवाचा फायदा यंत्रणेला घेता आला नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.  कृषी खात्यातील अभ्यासू अधिकाऱ्यांमध्ये समावेश असलेल्या डॉ. लोकरे हे व्यवस्थापन शास्त्र, वर्तणूक शास्त्राचेदेखील अभ्यासक आहेत. आपल्या ३५ वर्षांच्या सेवेतून ते पुढील काही महिन्यानंतर निवृत्त होतील. कीटकशास्त्रामध्ये पीएचडी असलेल्या डॉ. लोकरे यांनी क्रॉपसॅप प्रकल्पात काम केले. त्यामुळे या प्रकल्पाला ई-गव्हर्नन्सच्या क्षेत्रात केंद्र शासनाने २०११ मध्ये सुवर्णपदक जाहीर केले.  मराठवाड्यातून शिक्षण घेत १९८७ मध्ये तंत्र अधिकारी म्हणून रुजू झालेले डॉ. लोकरे यांनी २०११ मध्ये उपसंचालकपदाची सूत्रे हाती घेतली. कृषी विभागाकडून वाटल्या जाणाऱ्या अवजारांबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यांच्याकडे विदर्भ पॅकेजमधील अवजार गुणवत्तेचे कामकाज देण्यात आले होते.   “गुण नियंत्रण विभागात काम करताना कायदे व न्यायालयीन बाबी सखोलपणे समजावून घेतल्यामुळे आपल्या कालावधीत सर्वात जास्त निकाल कृषी विभागाच्या बाजूने लागले. भविष्यात ही माहिती आपण कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाच्या रूपाने द्यायला आवडेल. संधी मिळो अथवा न मिळो; प्रशिक्षणाचे काम आपण चालू ठेवू,’’ असे श्री. लोकरे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com