डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान

परुळेकर पुरस्कार
परुळेकर पुरस्कार

पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी (ता.२०) स्वातंत्र्यसैनिक (कै.) ना. अ. पेंडसे पुरस्कृत ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार’ ‘सकाळ-ॲग्रोवन’चे वरिष्ठ बातमीदार मनोज कापडे, तसेच नाशिक आवृत्तीमधील बातमीदार नरेश हळनोर आणि मुंबई आवृत्तीमधील बातमीदार प्रशांत कांबळे यांना मंजुळे यांच्या हस्ते या वेळी प्रदान करण्यात आला.  या वेळी वाहतूक नियमन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या दीपा लोहोटेकर, लडाखमध्ये ५५५ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करणारे आशिष कासवदेकर, आपत्तीमधील नागरिकांसाठी कार्यरत प्रमोद बलकवडे, हरविलेल्या चार वर्षांच्या मुलीला तिच्या पालकांपर्यंत पोचविणारे संकेत कालगावकर आणि रेल्वे प्रवाशांच्या हक्कांसाठी ४० वर्षांपासून अधिक काळ कार्यरत असलेल्या हर्षा शहा या ‘सकाळ’च्या वाचकांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.  ‘सकाळ’ समूहाचे संचालक भाऊसाहेब पाटील, संचालक- संपादक श्रीराम पवार याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. संपादक सम्राट फडणीस यांनी स्वागत-प्रास्ताविकात ‘सकाळ’च्या विस्तारणाऱ्या समाजोपयोगी विविध उपक्रमांची माहिती या वेळी दिली. यशस्वी झालो; प्रस्थापित व्हायचे नाही ‘पिस्तुल्या’पासून ‘सैराट’पर्यंत झालेला प्रवास.... ‘सैराट’ची सुचलेली कथा... ‘जब्या’ कसा सापडला..अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा अनुभव....याची गुपितं उलगडतानाच उनाड विद्यार्थी, प्रख्यात दिग्दर्शक कसा झाला, याचे पैलू पुणेकरांसमोर उलगडत गेले ते संवेदनशील कवी असलेल्या नागराज मंजुळे यांच्या उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मुलाखतीमधून. लौकिकार्थाने यशस्वी झालो असलो तरी प्रस्थापित व्हायचे नाही, तसा झालो तर तुम्ही जब्यासारखा दगड मारा, असे त्यांनी आवर्जून सांगितले. ‘सकाळ’चे वरिष्ठ उपसंपादक मंदार कुलकर्णी आणि ‘साम’च्या प्रतिनिधी प्रेरणा जंगम यांनी मंजुळे यांची मुलाखत घेतली. उनाडपणामुळे दहावीत अनुत्तीर्ण झालो आणि तेथूनच करिअरला निर्णायक वळण मिळाले. कविता लेखनाची आवड लागली अन्‌ वाचनाचीही. त्याच काळात लेखन सुरू केले. त्यामुळे वैचारिक जडणघडण झाली. सोबत वडील पोपटराव आणि काका बाबूराव यांनी केलेल्या संस्कारांची शिदोरी होतीच. पदवीच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्यावर त्याला धार आली, असे सांगत मंजुळे यांनी त्यांचा जीवनपट उलगडला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com