agriculture news in Marathi, Dr. Nanasaheb Parulekar award distributed, Maharashtra | Agrowon

डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार प्रदान
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी (ता.२०) स्वातंत्र्यसैनिक (कै.) ना. अ. पेंडसे पुरस्कृत ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार’ ‘सकाळ-ॲग्रोवन’चे वरिष्ठ बातमीदार मनोज कापडे, तसेच नाशिक आवृत्तीमधील बातमीदार नरेश हळनोर आणि मुंबई आवृत्तीमधील बातमीदार प्रशांत कांबळे यांना मंजुळे यांच्या हस्ते या वेळी प्रदान करण्यात आला. 

पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी (ता.२०) स्वातंत्र्यसैनिक (कै.) ना. अ. पेंडसे पुरस्कृत ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार’ ‘सकाळ-ॲग्रोवन’चे वरिष्ठ बातमीदार मनोज कापडे, तसेच नाशिक आवृत्तीमधील बातमीदार नरेश हळनोर आणि मुंबई आवृत्तीमधील बातमीदार प्रशांत कांबळे यांना मंजुळे यांच्या हस्ते या वेळी प्रदान करण्यात आला. 

या वेळी वाहतूक नियमन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या दीपा लोहोटेकर, लडाखमध्ये ५५५ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करणारे आशिष कासवदेकर, आपत्तीमधील नागरिकांसाठी कार्यरत प्रमोद बलकवडे, हरविलेल्या चार वर्षांच्या मुलीला तिच्या पालकांपर्यंत पोचविणारे संकेत कालगावकर आणि रेल्वे प्रवाशांच्या हक्कांसाठी ४० वर्षांपासून अधिक काळ कार्यरत असलेल्या हर्षा शहा या ‘सकाळ’च्या वाचकांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. 

‘सकाळ’ समूहाचे संचालक भाऊसाहेब पाटील, संचालक- संपादक श्रीराम पवार याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. संपादक सम्राट फडणीस यांनी स्वागत-प्रास्ताविकात ‘सकाळ’च्या विस्तारणाऱ्या समाजोपयोगी विविध उपक्रमांची माहिती या वेळी दिली.

यशस्वी झालो; प्रस्थापित व्हायचे नाही
‘पिस्तुल्या’पासून ‘सैराट’पर्यंत झालेला प्रवास.... ‘सैराट’ची सुचलेली कथा... ‘जब्या’ कसा सापडला..अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा अनुभव....याची गुपितं उलगडतानाच उनाड विद्यार्थी, प्रख्यात दिग्दर्शक कसा झाला, याचे पैलू पुणेकरांसमोर उलगडत गेले ते संवेदनशील कवी असलेल्या नागराज मंजुळे यांच्या उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मुलाखतीमधून. लौकिकार्थाने यशस्वी झालो असलो तरी प्रस्थापित व्हायचे नाही, तसा झालो तर तुम्ही जब्यासारखा दगड मारा, असे त्यांनी आवर्जून सांगितले. ‘सकाळ’चे वरिष्ठ उपसंपादक मंदार कुलकर्णी आणि ‘साम’च्या प्रतिनिधी प्रेरणा जंगम यांनी मंजुळे यांची मुलाखत घेतली. उनाडपणामुळे दहावीत अनुत्तीर्ण झालो आणि तेथूनच करिअरला निर्णायक वळण मिळाले. कविता लेखनाची आवड लागली अन्‌ वाचनाचीही. त्याच काळात लेखन सुरू केले. त्यामुळे वैचारिक जडणघडण झाली. सोबत वडील पोपटराव आणि काका बाबूराव यांनी केलेल्या संस्कारांची शिदोरी होतीच. पदवीच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्यावर त्याला धार आली, असे सांगत मंजुळे यांनी त्यांचा जीवनपट उलगडला. 

इतर बातम्या
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊससातारा : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१८) सर्वदूर...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...