राज्यात दुधाचे दोनच ब्रॅंड हवे ः आमदार गोऱ्हे

सरकारने दूध संघांना सक्षम करायचा प्रयत्न करावा आणि शेतकरी सक्षम होतील, असे धोरण राबवावे. - डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार.
विधीमंडळ अधिवेशन
विधीमंडळ अधिवेशन

नागपूर  ः शासन, सहकारचा एक आणि दुसरा खासगी असे दुधाचे दोनच ब्रॅंड राज्यात असतील तरच ग्राहकांची व शेतकऱ्यांची लूट थांबणार आहे, असे सांगत शिवसेनेचा दूध उत्पादकांना थेट पाच रुपये प्रतिलिटर अनुदानाच्या मुद्याला पाठिंबा असल्याची माहिती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

विधान परिषदेत चर्चेच्या वेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. आमदर गोऱ्हे म्हणाल्या, की १९६५ ला दुधाची प्रतिदिन एक लाख लिटरची उलाढाल होती. आता ती २१ लाख लिटरवर पोचली आहे. वडगाव आमली (जि. नगर) येथील कल्याणकारी दूध उत्पादन संघाच्या वतीने गुलाबराव डेरे यांनी मला निवेदन दिले आहे; त्यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बऱ्याच प्रश्‍नांवर प्रकाश पडतो. दूधक्षेत्रात ४० टक्‍के वाटा सहकार क्षेत्राचा, ६० टक्‍के खासगी क्षेत्राचा वाटा आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर दुधाचे ब्रॅंड कमी करून एकच ब्रॅंड असावा. गावोगावी खासगी संख्या दुधाचा दर्जा सांभाळतातच असे नाही. त्याचसोबत दूधभेसळ प्रतिबंधक उपाय गरजेचे आहेत. परराज्यांतील दुधावर कर लावण्यात यावा व त्याचवेळी टोन्ड दूध बंद करून गाईचे दूध अशा खास ब्रॅंडला प्रोत्साहन द्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com