कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ. परुळेकर पुरस्कार'

कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ. परुळेकर पुरस्कार'
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ. परुळेकर पुरस्कार'

पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे बातमीदार मनोज कापडे, तसेच ‘सकाळ'च्या नाशिक आवृत्तीमधील बातमीदार नरेश हळनोर आणि मुंबई आवृत्तीमधील बातमीदार प्रशांत कांबळे यांना यंदाचा ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार' जाहीर झाला.   विविध विषयांवर आणि सामाजिक प्रश्‍नांवर सातत्याने लेखन करणाऱ्या ‘सकाळ समूहाच्या'च्या बातमीदारांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार (कै.) ना. अ. पेंडसे यांनी दिलेल्या निधीतून हा पुरस्कार देण्यात येतो. ‘सकाळ'चे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे नागराज मंजुळे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.  कृषी खात्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आणि कृषी उद्योजकांच्या अडवणुकीबाबत कापडे यांनी ‘ॲग्रोवन’मधून दिलेल्या बातम्यांमुळे कृषी खात्याच्या कारभारात अनेक सकारात्मक बदल झाले. राज्य सरकारनेही या बातम्यांची दखल घेऊन कृषी खात्याच्या कामकाजात सुधारणेसाठी पावले उचलली.   नाशिक आवृत्तीचे बातमीदार म्हणून काम करणारे हळनोर यांनी ‘इनक्‍युबेटरचा कोंडवाडा'' या वृत्तमालिकेतून नाशिकमधील नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रकरण सप्टेंबर २०१७ मध्ये उजेडात आणले. यानंतर शासकीय पातळीवर झालेल्या कार्यवाहीमुळे जिल्हा रुग्णालयात मरण पावणाऱ्या नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण निम्म्याने कमी झाले. अपंग विकास महामंडळाकडे राज्यातील अपंग शेतकऱ्यांनी कर्जासाठी अर्ज केला म्हणून अपंग शेतकऱ्यांच्या सातबारावर २०१७ मध्ये कर्जाचा बोजा चढविण्यात आला होता. त्यामुळे अपंग शेतकऱ्यांना कर्ज मिळत नव्हते. याबाबतची कांबळे यांची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अपंग महामंडळाने सातबारावरील कर्जाची तरतूद काढून टाकली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com