agriculture news in Marathi, Dr. Parulekar award for this year announced to Kapde, Halnor and Kamble, Maharashtra | Agrowon

कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ. परुळेकर पुरस्कार'
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे बातमीदार मनोज कापडे, तसेच ‘सकाळ'च्या नाशिक आवृत्तीमधील बातमीदार नरेश हळनोर आणि मुंबई आवृत्तीमधील बातमीदार प्रशांत कांबळे यांना यंदाचा ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार' जाहीर झाला.  

पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे बातमीदार मनोज कापडे, तसेच ‘सकाळ'च्या नाशिक आवृत्तीमधील बातमीदार नरेश हळनोर आणि मुंबई आवृत्तीमधील बातमीदार प्रशांत कांबळे यांना यंदाचा ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार' जाहीर झाला.  

विविध विषयांवर आणि सामाजिक प्रश्‍नांवर सातत्याने लेखन करणाऱ्या ‘सकाळ समूहाच्या'च्या बातमीदारांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार (कै.) ना. अ. पेंडसे यांनी दिलेल्या निधीतून हा पुरस्कार देण्यात येतो. ‘सकाळ'चे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे नागराज मंजुळे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

 कृषी खात्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आणि कृषी उद्योजकांच्या अडवणुकीबाबत कापडे यांनी ‘ॲग्रोवन’मधून दिलेल्या बातम्यांमुळे कृषी खात्याच्या कारभारात अनेक सकारात्मक बदल झाले. राज्य सरकारनेही या बातम्यांची दखल घेऊन कृषी खात्याच्या कामकाजात सुधारणेसाठी पावले उचलली.  

नाशिक आवृत्तीचे बातमीदार म्हणून काम करणारे हळनोर यांनी ‘इनक्‍युबेटरचा कोंडवाडा'' या वृत्तमालिकेतून नाशिकमधील नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रकरण सप्टेंबर २०१७ मध्ये उजेडात आणले. यानंतर शासकीय पातळीवर झालेल्या कार्यवाहीमुळे जिल्हा रुग्णालयात मरण पावणाऱ्या नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण निम्म्याने कमी झाले.

अपंग विकास महामंडळाकडे राज्यातील अपंग शेतकऱ्यांनी कर्जासाठी अर्ज केला म्हणून अपंग शेतकऱ्यांच्या सातबारावर २०१७ मध्ये कर्जाचा बोजा चढविण्यात आला होता. त्यामुळे अपंग शेतकऱ्यांना कर्ज मिळत नव्हते. याबाबतची कांबळे यांची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अपंग महामंडळाने सातबारावरील कर्जाची तरतूद काढून टाकली होती.

इतर बातम्या
पावसामुळे पिकांचे नुकसान सुरुचपुणे  : राज्याच्या विविध भागांत मॉन्सूनोत्तर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे  : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात...
फलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा  : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...