agriculture news in Marathi Dr. patil selected as vice chancellor of Rahuri agriculture University Maharashtra | Agrowon

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. पी. जी. पाटील 

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी अखेर डॉ. पी. जी. पाटील यांच्या नावाची घोषणा राजभवनातून शनिवारी (ता.२७) दुपारी करण्यात आली.

पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी अखेर डॉ. पी. जी. पाटील यांच्या नावाची घोषणा राजभवनातून शनिवारी (ता.२७) दुपारी करण्यात आली. 

विद्यापीठाचे कुलपतिपद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आहे. त्यांनी कुलगुरुपदासाठी पाच शास्त्रज्ञांच्या अंतिम मुलाखती सहा फेब्रुवारीला घेतल्या होत्या. तथापि, नावाची घोषणा वेळेत न केल्याने राज्यभर उलटसुलट चर्चा सुरू होती. ‘अॅग्रोवन’ने मात्र डॉ. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त दोन आठवड्यांपूर्वीच दिले होते. 

मुंबईतील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक म्हणून सध्या डॉ. पी. जी. तथा प्रशांतकुमार पाटील काम पाहत आहेत. ते सांगली जिल्ह्याचे भूमिपुत्र असून, कृषी शिक्षण त्यांनी याच विद्यापीठातच पूर्ण केले आहे. ‘‘बीटेक कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांनी राहुरीत घेतल्याने विद्यापीठाची पूर्ण प्रशासकीय व शैक्षणिक रचना डॉ. पाटील यांना अवगत आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कुलगुरू उमेदवार शोधासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्षपद भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक डॉ. लक्ष्मणसिंह राठोड यांच्याकडे होते. तसेच भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (आयएआरआय) संचालक डॉ. ए. के. सिंग व कृषी सचिव एकनाथ डवले हे समितीचे सदस्य होते. 

‘‘महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाला संशोधन व विस्ताराचा मोठा वारसा आहे. कुलगुरू म्हणून तेथे काम करणे माझ्यासाठी आनंददायक आहे,” अशी प्रतिक्रिया नवनियुक्त कुलगुरू डॉ. पी. जी.पाटील यांनी व्यक्त केली. 

प्रतिक्रिया
सध्या मनुष्यबळाची अडचण असली तरी ती स्वीकारूनच काम करावे लागेल. मात्र आम्ही समस्येत देखील संधी शोधू. तंत्रज्ञानाची जास्तीत जास्त मदत घेऊ. अध्यापन, संशोधन व विस्तारासाठी उपलब्ध स्रोतांची पुनर्रचना केली जाईल. हे करताना अंतिम उद्दिष्ठ शेतकऱ्यांसाठी उत्तम पद्धतीने सेवा कशी देता येईल हेच असेल. 
- डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 


इतर अॅग्रो विशेष
खतांची दरवाढ नाहीपुणे : रासायनिक खतांच्या किमतींमध्ये कोणत्याही...
खरिपाचे गावनिहाय नियोजन ः कृषिमंत्रीकोल्हापूर ः खरिपाचे नियोजन गावातच करण्यासाठी...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
राज्यात कृषिपंपधारकांकडून १,१६० कोटींचा...कोल्हापूर : कृषिपंप वीज धोरण योजनेअंतर्गत ११ लाख...
‘रोहयो’ शेततळ्यात प्लॅस्टिक...पुणे : रोजगार हमी योजनेतून शेततळे खोदण्यासाठी...
जोरदार पावसाची शक्यतापुणे : ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. तसेच...
प्राधान्यक्रम एका बाबीला, निवड दुसऱ्याच... नगर : कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
अवकाळीचा आजपासून अंदाजपुणे : दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ...
लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात...लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा...
गावरानपेक्षा ब्रॉयलर चिकनला अधिक दरनगर ः राज्यात पहिल्यांदाच गावरान कोंबडीपेक्षा...
पशू बाजार बंद; शेतकरी बैल खरेदीसाठी...जळगाव ः खानदेशात गेल्या काही दिवसांपासून पशुधनाचे...
‘इफ्को’कडून खतांच्या किमतीत वाढपुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या...
खरीप, रब्बी पिकांसाठी पीककर्ज निश्चितीअमरावती : यंदाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी...
बाजार समित्या टाकणार ‘कात’पुणे : पणन सुधारणांमुळे होणाऱ्या संपूर्ण...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...
‘बोअरवेल’ संकटाच्या खाईत नेणारी ः...पुणे : श्रीमंतीच्या हव्यासाने आपण जमिनीवरचे पाणी...
बीड जिल्हा बँकेवर अखेर पाच जणांचे...बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर बुधवारी...