अभ्यासक्रमात कौशल्य विकासावर भर : डॉ. एस. डी. सावंत

दापोली कोकण कृषी विद्यापीठ
दापोली कोकण कृषी विद्यापीठ

रत्नागिरी ः दहा वर्षानंतर कोकण कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. त्यात प्रात्यक्षिक आणि कौशल्य विकासावर भर दिला गेला आहे. एक सेमिस्टर त्यासाठी ठेवण्यात आले असून, यामुळे विविध कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना अनुभव घेता येईल, अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. शिरगाव येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयातील कार्यक्रमांसाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. ते म्हणाले, कोकण कृषी विद्यापीठाशी गेली १८ वर्षे जोडल्या गेलेल्या मत्स्यविज्ञान महाविद्यालयाची संलग्नता विद्यापीठाशी जोडली गेल्यामुळे कृषीसह वने आणि मत्स्य या एकमेकांशी पूरक परिसंस्थांवर अभ्यास आणि संशोधन करणे सोपे जाणार आहे. दहा वर्षानंतर २०१७-१८ वर्षात अभ्यासक्रमात बदल केले आहेत. प्रात्यक्षिक आणि कौशल्य विकास करण्यावर भर दिला आहे. मत्स्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार महाविद्यालयात फिशरिज बिझनेस मॅनेजमेंट असा नवा अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे. कोकण कृषी विद्यापीठाने ४२ नव्या संशोधनासह तांदूळ आणि भेंडीची नवी प्रजाती निर्माण केली आहे. गेले दोन वर्षे बंद अवस्थेत असलेले फलोद्यान महाविद्यालय नव्याने आणि स्वतंत्रपणे सुरू झाले आहे. शिक्षण आणि संशोधन यांची उत्तम सांगड कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून घातली जात आहे. त्यामुळेच विद्यापीठाने ५९ वरून ३२ व्या क्रमांकावर मजल मारली आहे. 

शासन नोकरीसाठी सकारात्मक आंबेनळी अपघातात मृत झालेल्या तीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना कोकण कृषी विद्यापीठात सामावून घेण्यासाठी शासनही सकारात्मक आहे. त्यादृष्टीने भरतीचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. तीसपैकी अठरा जणांच्या नातेवाइकांना नोकरीत सामावून घेण्यातील तांत्रिक गोष्टी पूर्ण आहेत. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शासनाकडून आदेश आल्यानंतर तत्काळ कार्यवाही केली जाईल, असे कुलगुरू डॉ. सावंत यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com