agriculture news in marathi, dr punjabrao deshmukh krushi vidyapeeth will process on safflower, akola, maharashtra | Agrowon

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ करणार करडईवर प्रक्रिया
टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

कृषी विद्यापीठाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये २०० दुधाळ जनावरांचे संगोपन, तसेच करडईपासून तेलनिर्मिती करून पहिल्या टप्प्यात त्याची विद्यापीठ कर्मचाऱ्यांना विक्री करण्याचा प्रकल्प समाविष्ट आहे. त्याकरिता विद्यापीठ प्रक्षेत्रावर सुमारे ७० हेक्‍टरवर करडई लागवड केली आहे. हंगामाअखेरीस करडईपासून तेलनिर्मिती करता यावी, याकरिता आवश्‍यक ती यंत्रणा उभारण्यासंदर्भात कृषी अभियांत्रिकी विभागाचे डॉ. प्रदीप बोरकर यांच्याशी चर्चा केली आहे.
- डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

नागपूर  ः २०० देशी गाईंचे संगोपन करीत त्या माध्यमातून दुधाचा ब्रॅंड काढण्याची संकल्पना मांडणाऱ्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आता करडई लागवड करीत त्यावर प्रक्रिया करण्याचा विचार सुरू केला आहे. उत्पादित करडई तेलाची विक्री पहिल्या टप्प्यात विद्यापीठ कर्मचाऱ्यांना करण्याचे प्रस्तावित आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. विलास भाले यांनी वर्षभरापूर्वी पदभार स्वीकारला. त्यानंतर विद्यापीठाला आर्थिक स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने पूरक उपक्रम राबविण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्याअंतर्गत सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मितीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यानंतर गीर, साहिवाल जातीच्या २०० गाईंचे संगोपनाचा प्रकल्पदेखील विद्यापीठ लवकरच राबविणार आहे. या माध्यमातून संकलित होणाऱ्या दुधाचा ब्रॅंड तयार करून त्याची विक्री करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. याच प्रयत्नात आर्थिक स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पूरक ठरू पाहणाऱ्या आणखी एका उपक्रमाची जोड देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

त्यामध्ये करडईपासून तेलनिर्मिती करत त्याची विक्री करण्याच्या प्रकल्पाचा समावेश आहे.
कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी विद्यापीठाने पहिल्या टप्प्यात सुमारे ७० हेक्‍टरवर करडई लागवड केली आहे. या क्षेत्रात आणखी वाढ करण्याचा विचार आहे. त्यानंतर करडई लागवडीखालील एकूण क्षेत्र ८० ते ८५ हेक्‍टरपर्यंत जाईल.

 

इतर ताज्या घडामोडी
पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा...रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल...
कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...
सांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८...सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा...
नाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने...
धक्कादायक, एकाच गावातल्या ६०० मेंढ्या...नगर  ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर...
अधिक उपसा केला तर पाणी टंचाईची शक्यता...लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत...
नाशिक जिल्ह्यात नुकसानीपोटी १८१ कोटींची...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांना...
नाशिक जिल्ह्यात टोमॅटोला गेले तडे ! ५०...नाशिक  : मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यामुळे...
...'या' सिंचन योजनेची पाणीपट्टी होणार...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीची...
किसान सभेकडून विमा कंपनीला २८...पुणे : पुण्यातील दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून...
हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत...आळंदी, जि. पुणे  ः टाळ-मृदंगाचा निनाद आणि...
गूळ सौदे सुरू करण्यासाठी दोन्ही घटकांना...कोल्हापूर  : गेल्या दोन दिवसांपासून व्यापारी...
सांगली जिल्ह्यात ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी...सांगली : जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होताच...
कोल्हापुरात कारखान्यांकडून ऊसतोड सुरू...कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून...
जळगावात भरताची वांगी १५०० ते २६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...