agriculture news in Marathi, Dr. Sawant says, 100 villages will make ideal Maharashtra | Page 2 ||| Agrowon

दरवर्षी १०० गावे आदर्श करणार ः जलसंधारणमंत्री डॉ. सावंत
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

पुणे  : राज्याच्या ग्रामविकासाला आदर्श गाव योजनेच्या चळवळीने दिशा मिळते आहे. त्यामुळे पोपटराव पवार यांना बरोबर घेत १०० गावे दरवर्षी आदर्श करण्याचे वचन मी तुम्हाला देतो आहे, अशी घोषणा जलसंधारणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केली.

पुणे  : राज्याच्या ग्रामविकासाला आदर्श गाव योजनेच्या चळवळीने दिशा मिळते आहे. त्यामुळे पोपटराव पवार यांना बरोबर घेत १०० गावे दरवर्षी आदर्श करण्याचे वचन मी तुम्हाला देतो आहे, अशी घोषणा जलसंधारणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केली.

आदर्श गाव योजनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने ‘आदर्श गाव भूषण पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर आदर्श गाव संकल्प व प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, मृद्संधारण संचालक डॉ. कैलास मोते, सहसंचालक दादासाहेब सप्रे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, जलसंधारण विभागाचे अवर सचिव रवी व्हटकर उपस्थित होते.

मृद व जलसंधारण मंत्रालयाच्या या उपक्रमातील राज्यस्तरीय पाच लाखांचा पहिला पुरस्कार यंदा यवतमाळच्या कोठोडा गावाने पटकावला. ४२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या कोठोडा गावाचे यश पाहून सभागृहाने ग्रामस्थांचे कौतुक केले. आदर्श गावे आणि त्यासाठी झटणाऱ्या संस्था व व्यक्तींना टाळ्यांच्या कडकडाटात पुरस्कार देण्यात आले.  

“शासनाची मदत घेताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे मदतीविना मी स्वतः उस्मानाबाद जिल्ह्यात कशी कामे केली याची माहिती अवश्य तुम्ही घ्यावी. मी मंत्री नसतानाही जलयुक्त शिवाराला पर्यायी ठरणारी अशी कामे शिवजलक्रांती योजनेतून केली. २०१६ मध्ये आम्ही १४८ किलोमीटरचे नाला खोलीकरण केले. त्यामुळे साडेचार टीएमसी पाणी साचले. ही कामे आता साडेपाचशे किलोमीटरच्याही पुढे जातील. त्यामुळे सामूहिक संकल्प केल्यास गावांचा विकास दूर नसतो,” असे सावंत म्हणाले.

राज्यकर्त्यांशिवाय चळवळ पुढे जाणार नाही ः पवार
आदर्श गावासाठी पुढील पाच वर्षे काम करण्याची संधी आम्हाला मिळेल, अशा शब्दांत पोपटराव पवार यांनी जलसंधारणमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, “हिवरे बाजारला १९९७ आदर्श गावचा पुरस्कार मिळाला. तो घेण्यासाठी मी व्यासपीठावर गेलो होतो. पुढे त्याच योजनेचा कार्याध्यक्ष म्हणून संधी मिळेल असे कधी वाटले नव्हते. १९९२ ते २०१९ या काळात आदर्श गावे का वाढली नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आम्ही योजनेतून अनेक गावे आदर्श केली. मात्र, प्रसिद्धी न करता कामे सुरू ठेवली. त्यामुळे आदर्श गावांची संख्या वाढली आहे. मात्र, राज्यकर्ते ठरवीत नाहीत तोपर्यंत ही चळवळ पुढे जाणार नाही.”

पुरस्कारार्थींची नावे अशी
उत्कृष्ट आदर्श गाव ः प्रथम - कोठोडा (ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ), द्वितीय - मौजे शेळगाव गौरी(नायगाव, जि. नांदेड), भागडी (आंबेगाव, जि. पुणे), तृतीय - गोधनी (उमरेड, जि. नागपूर), वीरसई (दापोली, जि. रत्नागिरी).
उत्कृष्ट प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण संस्था ः प्रथम - ज्ञानशक्ती विकास वाहिनी (मंचर, आंबेगाव, जि. पुणे), द्वितीय - प्रादेशिक बहुउद्देशीय शिक्षण व आरोग्य सेवा संस्था (गोधनी, उमरेड, जि. नागपूर), तृतीय - विकास सामाजिक संस्था (वरोरा, जि. चंद्रपूर).
उत्कृष्ट ग्राम कार्यकर्ता ः प्रथम - सुनील पावडे (कोठोडा, पांढरकवडा, जि. यवतमाळ), द्वितीय - काशिनाथ शिंपाळे (शेळगाव गौरी, नायगाव, नांदेड), तृतीय - परम काळे (गोधनी, उमरेड, जि. नागपूर), ज्ञानेश्वर उंडे (भागडी, आंबेगाव, जि. पुणे)

गावांची निवड तावूनसुलाखून ः डवले
जलसंधारण सचिव श्री. डवले यांनी आदर्श गाव योजनेत निवडली जाणारी गावे तावूनसुलाखून घेतली जात असल्याचे स्पष्ट केले. “आदर्श गाव योजनेत पाणलोट नियोजनाला महत्त्व दिले गेले आहे. मधल्या काळात उपक्रम थोडे संथ झाले होते. मात्र, पोपटराव पवार यांनी या चळवळीला वेग दिला आहे. आदर्श गाव संकल्पनेत केवळ हिवरे बाजार व राळेगणसिद्धीचीच चर्चा का होते, असा प्रश्न विचारला जात असे. मात्र, राज्यात १०३ गावे आदर्श म्हणून पुढे येत आहेत. जलयुक्त शिवार अभियानात रब्बी इंडेक्स किंवा वॉटर बजेटची संकल्पना हिवरे बाजारच्या प्रयोगातूनच घेण्यात आली,” असे श्री. डवले यांनी नमूद केले.

इतर अॅग्रो विशेष
नागपूरच्या बाजारात भाव खाणारी सावळीची...बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने विविध...
संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीच्या हालचालीपुणे : बाजार समित्यांच्या जोखडातून शेतीमालाची...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर...
‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात...सोलापूर : ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी...
२०१९ पशूगणना : गायींची संख्या १८...पुणे ः देशात २०१२ मध्ये ५१२ दशलक्ष पशुधन होते....
कर्जमाफीच्या गोंधळामुळे सोसायट्या संकटातसांगली ः कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही....
मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घटसोलापूर : मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटींच्या...
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...