युवा शेतकरी माझ्या डोळ्यासमोर : नवनियुक्त कुलगुरु डॉ. सावंत

युवा शेतकरी माझ्या डोळ्यासमोर : नवनियुक्त कुलगुरु डॉ. सावंत
युवा शेतकरी माझ्या डोळ्यासमोर : नवनियुक्त कुलगुरु डॉ. सावंत

मुंबई : कोकणातील शेतीचा विचार करता फळबाग, भात शेती, मसाला पिके आणि प्रक्रिया उद्योग हे महत्वाचे घटक आहेत.त्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसारावर भर देणार आहे. विशेषकरून युवा शेतकरी माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यांच्यापर्यंत शेती, पूरक उद्योगाचे तंत्रज्ञान पोहोचवण्याचे माझे ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त कुलगुरु डॉ. संजय दीनानाथ सावंत यांनी  अॅ्ग्रोवनशी बोलताना दिली.  राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. संजय दीनानाथ सावंत यांची दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी गुरुवारी (ता. ७) डॉ. सावंत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. सावंत यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील, यापैकी जो दिनांक अगोदर असेल, तोपर्यंत करण्यात आली आहे.   डॉ. तपस भट्टाचार्य यांनी ३१ ऑगस्ट २०१८ रोजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ यांच्याकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. डॉ. संजय सावंत हे दापोली कृषी महाविद्यालयाचे पदवीधर आहेत. डॉ. सावंत यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून एम. एससी (कृषी) ही पदवी प्राप्त केल्यानंतर पंतनगर येथील गोविंद बल्लभ पंत कृषी विश्वविद्यालयातून पीएच.डी. प्राप्त केली. त्यांचा अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी मुंबई उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. (डॉ.) मंजुला चेल्लूर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक |डॉ. त्रिलोचन महापात्रा आणि कृषी विभागाचे   सचिव एकनाथ डवले हे समितीचे अन्य सदस्य  होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानतर राज्यपालांनी डॉ. सावंत यांच्या नियुक्तीची गुरुवारी घोषणा केली. डॉ. सावंत सोमवारी (ता.११) कुलगुरूपदाचा पदभार स्विकारणार आहेत.  कुलगुरूपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना डॉ. एस.डी.सावंत म्हणाले की,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com