शेतकरी-इंडस्ट्रींमधील दुवा बना ः डॉ. सुधीरकुमार गोयल

एबीएम विद्यार्थ्यांसोबत माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, एसव्ही ग्रुपचे विकास दांगट, सह सरव्यवस्थापक अमोल बिरारी, मार्केटिंग व्यवस्थापक वसीम शेख, विशाल नाईक, शाहबाज शेख, हेमंत जगताप, सायली भांगरे, अमित मांजरे आदी.
एबीएम विद्यार्थ्यांसोबत माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, एसव्ही ग्रुपचे विकास दांगट, सह सरव्यवस्थापक अमोल बिरारी, मार्केटिंग व्यवस्थापक वसीम शेख, विशाल नाईक, शाहबाज शेख, हेमंत जगताप, सायली भांगरे, अमित मांजरे आदी.

पुणे ः शेतकरी आणि इंडस्ट्री यांच्यात मागणी आणि पुरवठा या दोन महत्त्वाच्या बाबींसंदर्भातील दरी ही मुख्य समस्या आहे. इंडस्ट्रींना ज्या गुणवत्तेचा शेतमाल लागतो, तो पीकविण्याबाबत तसेच पुरवठा करण्याबाबत शेतकऱ्यांना योग्य ती माहिती नसल्याने शेतकऱ्यांसोबत काम करायला मोठा वाव आहे. ‘एसआयएलसीचा ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता शेतकरी व इंडस्र्टी यांच्यातील दुवा बनण्याचे ध्येय ठेवा, असा मोलाचा सल्ला माजी अतिरिक्त मुख्य कृषी सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘सकाळ इंटरनॅशनल इंटरडिस्प्लीनरी लर्निंग सेंटर (एसआयआयएलसी) आणि देशातील अग्रगण्य विद्यापीठ ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) यांच्या संयुक्त विद्यमाने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ या कोर्सच्या पाचव्या बॅचला दिमाखात सुरवात झाली. कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गोयल बोलत होते. या वेळी एसव्ही ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक विकास दांगड, ‘एसआयआयएली’चे  सहसरव्यवस्थापक अमोल बिरारी या वेळी उपस्थित होते.  ‘‘शेतकऱ्यांची व इंडस्ट्रीची अडचण काय आहे ती जाणून घेऊन मी त्यासाठी काय योगदान देऊ शकतो, याविषयी विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे. ॲग्री बिझनेस याची सुरवातच मार्केटींगपासून होते म्हणून ‘एबीएम’ कोर्स केल्यानंतर शेतकऱ्यांना निविष्ठा पुरविणारे पुरवठादार व शेतकरी ज्यांना आपला माल विकतात ते खरेदीदार यांच्यात समन्वय साधून या दोन्ही घटकांना कसा फायदा होईल यावर काम करण्याला मोठा वाव आहे.  ॲग्री बिझनेस ही खूप मोठी मूल्यवर्धित साखळी असून तुम्ही प्रवर्तक (फॅसिलिटेटर) बना व याकामात चांगले योगदान द्या,’’ असेही डॉ. गोयल म्हणाले. ‘एसव्ही’ ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक विकास दांगट यांनी उद्योजकता, त्यासाठी आवश्यक दृष्टिकोन, नवीनवीन कल्पना, त्यांची अंमलबजावणी करण्याची आवड, क्षमता, फूड इंडस्ट्रींमधील फॉरवर्ड लिंकेजेस, टेक्नॉलॉजी  इत्यादी संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एबीएमच्या पाचव्या बॅचला सुरवात झाली असून सात दिवसांचा इंडक्शन कार्यक्रम आय़ोजिला आहे. ज्यात व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य इ. विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. मार्केटींग व्यवस्थापक वसीम शेख, विशाल नाईक यांचे यासाठी योगदान लाभले. कार्यक्रम समन्वयक सायली भांगरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम प्रमुख अमोल बिरारी यांनी आभार मानले.     नवीन बॅचसाठी नोंदणी सुरू   एबीएमच्या नवीन बॅचसाठी नोंदणी सुरू झाली असून, या कोर्सविषयी सविस्तर माहिती हवी असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क : ९१४६०३८०३२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com