agriculture news in marathi, Dr. in town Sujay Vikey, Shirdit Lokhandeini Marli Baji | Agrowon

नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत लोखंडेंनी मारली बाजी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 मे 2019

नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे डॉ. सुजय विखे पाटील २ लाख ४८ हजार २४३ मतांनी, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे विसाव्या फेरीअखेर १ लाख १५ हजार ५१९ मतांनी आघाडीवर होते. 

नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे डॉ. सुजय विखे पाटील २ लाख ४८ हजार २४३ मतांनी, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे विसाव्या फेरीअखेर १ लाख १५ हजार ५१९ मतांनी आघाडीवर होते. 

विसाव्या फेरीअखेर नगरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना ३ लाख ४४ हजार ३२४, तर शिर्डीमधून लोखंडे यांना ४ लाख ६७ हजार ३२२ मते मिळाली. कॉँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांना २० व्या फेरीअखेर ३ लाख ५१ हजार ८०३ मते मिळाली. डॉ. विखे पाटील आणि लोखंडे यांनी सुरवातीच्या फेरीपासून मतात घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. नगर व शिर्डीत एकूण २२ मतमोजणी फेऱ्या होतील. प्रत्येक मतदारसंघांत पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्याची मोजनी करून नंतर निकाल घोषित केला जाणार आहे. 

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव भाजपकडून लढले. राष्ट्रवादीने एनवेळी जगताप यांना रिंगणात उतरवले. मात्र जगताप यांनी प्रचारात आघाडी घेत कडवे अव्हाण उभे केले होते. सकाळी आठ वाजता एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये टपाली मतदानाने मोजणीला सुरवात झाली. त्यानंतर झालेल्या ईव्हीएम मशिनमधील मोजणीला सुरवात झाली. पहिल्याच फेरीत भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी बारा हजार मतांची आघाडी घेतली. त्यानंतर प्रत्येक फेरीत डॉ. सुजय यांच्या आघाडीत भर पडत गेली. 

शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून लोखंडे, तर कॉँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे निवडणूक रिंगणात होते. कॉँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील, असे वातावरण तयार झाले होते. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांनी डॉ. सुजय विखे यांचा प्रचार करण्याची भूमिका घेतल्यावर त्यांना पदावरून काढून करण ससाणे यांना जिल्हाध्यक्ष केले, मात्र त्यांनीही अचानक राजीनामा दिल्याने मतदारसंघात बऱ्याच राजकीय भूमिका होत्या. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रभाव आहे. विखे यांनी मात्र उघडपणे सदाशिव लोखडे यांना मदत करण्याची भूमिका घेतली. या मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळणाऱ्या मतांवर निकाल अवलंबून असल्याचे सांगितले जात होते. शिवाय राहुल गांधी यांची सभा झाली होती. मात्र त्याचाही काहीच फायदा झाला नाही. येथे लोखंडे यांनीच बाजी मारली. 

पहिल्या फेरीत लोखंडे यांनी आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम टिकवली होती. लोखंडे यांनी २० व्या फेरीअखेर १ लाख १५ हजार ५१९ मताची आघाडी घेतली होती. नगर व शिर्डीत एकूण २२ मतमोजणी फेऱ्या होतील. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघात पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करून नंतर निकाल घोषित केला जाणार आहे. 

चर्चा ईव्हीएमचीच 
नगर येथे शिर्डी व नगर लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी एका ठिकाणी होती. त्यामुळे मतदान केंद्र प्रतिनिधी व बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होती. येथील उभारलेल्या मीडिया सेंटरमध्ये राज्यभरातील कौल घण्यासाठी लोकंची गर्दी होत होती. त्या वेळी राज्यभरातील धक्कादायक निकाल पाहता लोकांत ‘ईव्हीएम’चीच चर्चाच केली जात होती.

इतर बातम्या
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...