ड्रॅगन फ्रूटची कलमे आगीत भस्म

डॉ. मनोहर तिरमारे यांच्या काजू-आंबा, नारळाच्या बागेला लागलेल्या आगीत बाग पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र आग लागली कशी, याचे कारण समजू शकलेले नाही.
Dragon fruit cuttings burned in the fire
Dragon fruit cuttings burned in the fire

लांजा, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील धुंदरे येथे डॉ. मनोहर तिरमारे यांच्या काजू-आंबा, नारळाच्या बागेला लागलेल्या आगीत बाग पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र आग लागली कशी, याचे कारण समजू शकलेले नाही.

डॉ. तिरमारे यांची धुंदरे येथे लांजा वांजूदेवी नजीक आंबा, काजू, नारळाची बाग आहे. तिरमारे यांनी वैद्यकीय व्यवसाय सांभाळून स्वकष्टाने माळरानावर नंदन फुलवले. उत्पन्न देणाऱ्या या बागेला बुधवारी (ता. १९) दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. 

या आगीत दोनशे काजू, आंबा, नारळाची ७० झाडे, दोनशे ड्रॅगन फ्रूट कलमे आदींसह पंप, पाइप, दोन एकर असलेले ठिबक सिंचन, एक हजार फूट नेट, सागवान लाकूड इत्यादी साहित्य आगीमध्ये भस्मसात झाले. या ठिकाणी डॉ. तिरमारे यांनी कोरोना काळात दोन एकरांमध्ये आले आणि हळदीची लागवड केली आहे. घरापासून बाग एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. आग लागल्याचे तिरमारे यांना माहिती मिळताच लगेचच बागेत गेले. जाण्याआधी बाग जळून खाक झाली होती; मात्र पत्र्याच्या असलेल्या शेडला आग लागणार होती ती वाचवण्यात त्यांना यश आले. 

तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून, पंचनामा करून नुकसान भरपाईची नोंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्वतः मेहनत करून तिरमारे यांनी माळरानावर चांगली बाग तयार केली होती. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com