agriculture news in Marathi dress will distribute to jilha parishad students Maharashtra | Agrowon

पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना गणवेश देणार 

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 एप्रिल 2020

जिल्हा परिषदेच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्याची योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यासाठी एक किंवा शाळानिहाय वेगवेगळा ड्रेसकोड ठरविण्याबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल, सर्व विद्यार्थ्यांना गणवेशवाटप करणारी पुणे ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठरणार आहे. 
- रणजीत शिवतरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे 

पुणे: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांना यंदा दोन गणवेशाचे वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. शासकीय योजनेचा लाभ मिळत नसलेल्या विद्यार्थ्यांना गणवेशाचा पुरवठा करण्यासाठी अंदाजपत्रकात ४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सुमारे ८० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व शिक्षण समितीचे सभापती रणजीत शिवतरे यांनी दिली. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या आठवीपर्यंत वर्ग असलेल्या तीन हजार ७३७ शाळा आहेत. यामध्ये सुमारे अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी सर्व विद्यार्थिनी, मागासवर्गीय आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुला-मुलींना दरवर्षी प्रत्येकी दोन गणवेशासाठी सरकारकडून अनुदान प्राप्त होते.

त्यानुसार प्रति विद्यार्थी सहाशे रुपये निधी उपलब्ध होत होता. परिणामी सर्वसाधारण गट आणि इतर मागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थी या गणवेशापासून वंचित राहत होतो. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत नसलेल्या ७९ हजार ७५८ वंचित विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून (सेस फंड) गणवेशासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...