रेशन दुकानातून अंडी, चिकन देण्याला विरोध ः डॉ. कल्याण गंगवाल

Drinking eggs, chicken from ration shop: Dr. Kalyan Gangwal
Drinking eggs, chicken from ration shop: Dr. Kalyan Gangwal

पुणे ः मांसाहारातूनच विषाणूजन्य रोगांचा फैलाव होत असल्याचे स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू आणि कोरोना विषाणूच्या फैलावाद्वारे सिद्ध झाले आहे. भविष्यात अशा अनेक विषाणूंचा फैलाव होण्याची भीती असून, केंद्र सरकारची रेशनिंग दुकानांमधून चिकन, अंडी, मांस, मासे विक्री ही धोकादायक ठरणारी आहे. त्यामुळे निती आयोगाने प्रस्तावित केलेला हा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळावा. अन्यथा ६ एप्रिल रोजी देशव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी शुक्रवारी (ता. २८) पत्रकार परिषदेमध्ये दिला.

डॉ. गंगवाल म्हणाले, ‘‘निती आयोगाने सादर केलेल्या व्हीजन डाक्युमेंटमध्ये रेशन दुकानांमधून अंडी, मांस, चिकन विक्री करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. मटण, चिकन आणि अंडी म्हणजे पौष्टिक आहार असे मानणे चूक आहे. माणूस हा निसर्गतः शाकाहारी आहे, असे मानले जाते. शास्त्रीय दृष्टिकोनातूनही शाकाहारच योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. देशातील सुमारे साडेपाच लाख रेशन दुकानांमधून मटण, चिकन आणि अंडी पुरवण्याचा निर्णय घेतल्यास त्याच्या दर्जा बाबतचे अनेक प्रश्न उभे राहणार आहेत. या योजनेसाठी एक लाख ८४ हजार कोटी रुपयांचा खर्च होणार असून, अगोदरच रेशनिंग दुकानांबाबत भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येत असताना, नव्याने ही योजना म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी आहे,’’ तसेच मांसाच्या दर्जाची हमी कोण घेणार, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

‘‘मांसाहारातून अनेक रोग मानवी शरीरात येत आहेत. मॅड काऊ डिसीज, इबोला, स्वाइन फ्लू, सार्स यांसारख्या भयानक रोगांच्या जंतूंचा उगम मांसाहारातून होतो. नुकताच चीनसह जगभर करोना व्हायरस (कोविड २०१९) थैमान घालत असून, तोही मांसाहारातूनच आलेला आहे. मांसाहारासाठी विविध प्राण्यांचा वापर करणारा चीन देश हादेखील शाकाहाराकडे वळत असून, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा स्वतः शुद्ध शाकाहारी असल्याने त्यांनी या प्रस्तावाला मान्यता देऊ नये. अन्यथा आम्ही ६ एप्रिल रोजी देशपातळीवर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही,’’ असा इशाराही यावेळी डॉ. गंगवाल यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com