पिण्याच्या पाण्यासाठी `अक्कलपाडा`चे आवर्तन द्या

पिण्याच्या पाण्यासाठी `अक्कलपाडा`चे आवर्तन द्या
पिण्याच्या पाण्यासाठी `अक्कलपाडा`चे आवर्तन द्या

धुळे : जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे पाणीटंचाई वाढत आहे. पांझरा नदीकाठच्या गावांत पाणीटंचाईची भीषण समस्या आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून मात्र काहीच उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे. किमान पिण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून नदीकाठच्या गावांसाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी धुळे, शिंदखेडा भागातील शेतकऱ्यांनी केली.    

धुळे तालुक्‍यात सलग चौथ्या वर्षी दुष्काळी स्थिती आहे. गावोगावच्या विहिरी, कूपनलिका कोरड्या पडत आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. धुळे व शिंदखेडा तालुक्‍यात सुमारे १६ टॅंकर सुरू आहेत. नव्या प्रस्तावावर कार्यवाहीची मागणी केली जात आहे. काही गावांत प्रशासनाने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. तरीही अनेक गावांत टंचाई वाढली आहे. विशेषतः पांझरा नदीकाठच्या गावांतील स्थिती गंभीर आहे. नदी कोरडीठाक आहे. शिंदखेडा, धुळ्यातील अनेक गावांच्या पाणी योजनांच्या वहिरी पांझरा नदीकाठी आहेत. त्यात अपेक्षित जलस्त्रोत नाहीत. अक्कलपाडातून पाणी सोडल्यास पाणीटंचाई कमी होऊ शकते. शिवारातील विहिरींचेही पुनर्भरण होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

विहिरींची पाणीपातळी घटली नेरची लोकसंख्या सुमारे २५ हजारांवर अाहे. गावातील पाणीपुरवठ्याच्या दोन्ही विहिरींची पातळी घटली आहे. यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई आहे. सध्या एकाच विहिरीवरून दर आठ दिवसांनी गावातील एका गल्लीत पाणीपुरवठा होतो. आनंदखेडे येथेही सध्या तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. धुळे शहरासाठी नकाणे तलावात अक्कलपाडा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले जात आहे. यामुळे पांझरा नदीकाठच्या गावांचाही विचार व्हावा, अशी आग्रही मागणी लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com