पिण्याचे सव्वाअकरा टीएमसी पाणी आरक्षित

पिण्याचे सव्वाअकरा टीएमसी पाणी आरक्षित
पिण्याचे सव्वाअकरा टीएमसी पाणी आरक्षित

नगर : जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने गावशिवारांत पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई जाणवत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पिण्यासाठी धरण, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प यांतून ११.३० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.  

जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केल्या जाणाऱ्या २७६ योजना आहेत. त्यांद्वारे ८१९ गावांतील ४१ लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या योजनांसाठी चार हजार ५५२ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित, तर जनावरांसाठी एक हजार २६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे.

यंदा पावसाच्या ४९७ मिलिमीटर सरासरीपेक्षा अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगाम वाया गेला आहे. जलस्तर घटल्याने तहान भागविण्याचे भीषण संकट उभे ठाकले आहे. आगामी १५ जुलैपर्यंतच्या कालावधीचा विचार करता, मुळा, भंडारदरा, दारणा, कुकडी या धरण प्रकल्पांसह मध्यम प्रकल्प व बंधाऱ्यांतील सव्वाअकरा टीएमसी पाणीसाठा आरक्षित केला आहे.

यंदा दुष्काळी स्थितीत जिल्ह्यातील प्रकल्प भरले नाहीत. भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घटली. ती आणखी खालावणार आहे. नोव्हेंबरच्या मध्यावधीतच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या टॅंकरची संख्या दोनशेच्या पुढे गेली आहे. त्यामुळे १५ ऑक्‍टोबर ते आगामी १५ जुलै २०१९च्या कालावधीचा विचार करून जनतेला आणि जनावरांना पाणीटंचाईची झळ बसू नये, यासाठी पिण्याचे पाणी आरक्षित केले आहे. गेल्या वेळच्या तुलनेत पावणेचार दशलक्ष घनफूट जास्त पाणी आरक्षित करण्यात आले आहे.

धरण, प्रकल्पांतील आरक्षित पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)
कुकडी ३०२८.७८४
मुळा २९४६.७७९
भंडारदरा २१८५.१३२
दारणा- गंगापूर १२१०.२८
जायकवाडी २८८.६७५
पालखेड १३०.३५२
मध्यम प्रकल्प ३२५.८९२
लघु प्रकल्प ६५५.४३१
कोल्हापुरी बंधारे १६.४०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com