agriculture news in marathi, Drip subsidy 190 crore pending from Central government | Agrowon

ठिबकचे १९० कोटी केंद्रात अडकले

टीम अॅग्रोवन
सोमवार, 5 मार्च 2018

पुणे : ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटण्यासाठी ३८० कोटीचा निधी दिला जाईल, असे सांगणाऱ्या केंद्र शासनाने प्रत्यक्षात १९० कोटी रुपये अजूनही राज्याला दिलेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात ठिबकसाठी एकूण तब्बल ७६४ कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचे सांगितले जात होते. ठिबक योजनेच्या इतिहासात राज्याला इतका प्रचंड निधी प्रथमच दिला जात होता. प्रत्यक्षात केंद्र शासनाकडून निधी वाटपात दिरंगाई होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

पुणे : ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटण्यासाठी ३८० कोटीचा निधी दिला जाईल, असे सांगणाऱ्या केंद्र शासनाने प्रत्यक्षात १९० कोटी रुपये अजूनही राज्याला दिलेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात ठिबकसाठी एकूण तब्बल ७६४ कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचे सांगितले जात होते. ठिबक योजनेच्या इतिहासात राज्याला इतका प्रचंड निधी प्रथमच दिला जात होता. प्रत्यक्षात केंद्र शासनाकडून निधी वाटपात दिरंगाई होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

‘ठिबक संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना वाटण्यासाठी ६२० कोटी रुपयांचा अनुदान आराखडा केंद्र शासनाने मंजूर केला आहे. यात केंद्राचा वाटा ३८० कोटी रुपये तर राज्याचा हिस्सा २४० कोटीचा आहे. केंद्राचा वाटा आल्याशिवाय राज्य शासनदेखील स्वतःचा हिस्सा देत नाही. केंद्राने पहिला १९० कोटींचा वाटा पाठविला. मात्र, दुसरा १९० कोटाचा हप्ता अजूनही दिलेला नाही,’ असी माहिती सूत्रांनी दिली.

आधीचा पाठविलेला ५० टक्के निधी खर्च केल्याशिवाय दुसरा हप्ता न पाठविण्याचे धोरण केंद्राचे असते. तथापि, या प्रकरणात राज्य शासनाने ७५ टक्के निधी खर्च केलेला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०१७-१८ चा निधी मार्चअखेर न पाठवून केंद्राने राज्याच्या कृषी विभागाची डोकेदुखी वाढवून ठेवली आहे.

सूक्ष्म सिंचन योजनेतील स्वतःचा वाटा म्हणून ३८० कोटी रुपयांचा निधी केंद्र शासन देणार असल्याचे पत्र राज्य शासनाला मिळाले होते. त्यानुसार राज्य शासनाने आपला वाटा म्हणून २४० कोटी रुपयांची तरतूद केली. त्याच भरवशावर कृषी आयुक्तालयाने राज्यातील शेतकऱ्यांकडून ठिबक अनुदानासाठी हजारो अर्ज मागवून ठेवले आहेत.

‘आतापर्यंत ४ लाख ८५ हजार शेतकऱ्यांनी ठिबक अनुदानासाठी अर्ज केले असून, त्यात दोन लाख ७३ हजार अर्जांना अनुदानासाठी पूर्वसंमती दिली आहे. पूर्वसंमती दिलेल्या अर्जांची एकूण संख्या पाहिली अनुदानासाठी प्रत्यक्षात ८४३ कोटी रुपयांची आवश्यकता आहे,’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.

६७ हजार शेतकऱ्यांची अडचण शक्य
केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून आतापर्यंत एक लाख ८६ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत थेट अनुदान जमा करण्यात आले आहे. परंतु, एक लाख ६७ हजार शेतकऱ्यांना अजून अनुदान देणे बाकी आहे. उपलब्ध निधीतून एक लाख शेतकऱ्यांना अनुदान देता येईल. मात्र, उर्वरित ६७ हजार शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपाला उशीर होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 


इतर ताज्या घडामोडी
शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन ...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे अनुदान...
कृषिमंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यातच पीक...नाशिक : मूग नक्षत्राच्या तोंडावर पेरणीयोग्य पाऊस...
मराठवाड्यात बॅंकांकडून शेतकऱ्यांची...औरंगाबाद : मराठवाड्यात पूर्वमोसमी पाऊस बऱ्यापैकी...
सोलापूर जिल्ह्यात पीक कर्जवाटप अवघ्या...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
परभणी जिल्ह्यातील शिल्लक कापसाची...परभणी : शासकीय खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी...
मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत ३६५ टॅंकर...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड,...
जैविक किटकनाशकांद्वारे पर्यावरणाचे...परभणी : ‘‘शेतीत रासायनिक किटकनाशकांचा वापर मोठ्या...
निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना तातडीने मदत...पुणे  ः निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या...
वऱ्हाडात २५ टक्क्यांपेक्षाही कमी...अकोला  ः जून महिना सुरु झाला असून वऱ्हाडातील...
पर्यावरणातील बदलांकडे लक्ष देऊन शेती...औरंगाबाद : ‘‘पर्यावरणातील सततच्या बदलाने आपल्या...
पीक कर्जासाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः कर्जमाफीच्या गोंधळामुळे...
सातारा जिल्हा बॅंकेकडून कर्ज व्याजदरात...सातारा  : `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु...
नगर जिल्ह्यात पीककर्ज वाटपात...नगर  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज पुरवठ्याकडे...
सांगली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची गती...सांगली  : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
रत्नागिरी जिल्हा बॅंकेकडून सव्वा पाच...रत्नागिरी  ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात...
कोल्हापूर जिल्ह्यात ६६ टक्के पीककर्ज...कोल्हापूर : जिल्ह्यात खरिपासाठी मे अखेरपर्यंत ६६...
नागपूर जिल्ह्यात १३ टक्के पीककर्ज वितरितनागपूर  ः माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी...
यवतमाळमध्ये खरिपासाठी २४.५१ टक्केच...यवतमाळ  ः शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा अशी ओळख...
उत्तर भारताच्या दिशेने मॉन्सून वेगाने...महाराष्ट्रावर उत्तरेस १००४ तर मध्यावर व दक्षिणेस...
चंद्रपूर जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...चंद्रपूर  ः चंद्रपूर जिल्ह्यातील बॅंका खरीप...