कांदा परस्पर विकून चालक फरार

कांदा परस्पर विकून चालक फरार
कांदा परस्पर विकून चालक फरार

मनमाड, जि. नाशिक : मनमाड येथून वेस्ट बंगाल येथे ट्रकद्वारे पाठविण्यात आलेला तब्बल ३ लाख ६५ हजार रुपयांचा कांदा ट्रकचालकाने परस्पर विकला. तसेच गाडी भाडे म्हणून घेतलेले ६१ हजार रुपयेही हडप केले. या प्रकरणी मनमाड शहर पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात सोमवारी (ता. २२) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणुकीच्या घटनेने परिसरातील कांदा व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहाडी (धुळे) येथील कांदा व्यापारी गुरुदीपसिंग गुरुमेल सिंग हंस यांनी मनमाड येथील खळ्यातून ३ लाख ६५ हजार रुपयांचा कांदा खरेदी करून तो वेस्ट बंगाल येथे अंदमान इंटरप्राइज यांच्याकडे पाठविण्यासाठी मालट्रक (सीजी ०४ जेडी ७९५१)द्वारे पाठविला. मात्र हा ट्रक पश्चिम बंगाल येथे पोचलाच नाही. साडेतीन लाखांहून अधिक किमतीच्या कांद्याची मध्येच कुठे परस्पर विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com