Agriculture news in marathi Driver arrested in HTBT seed transport case | Agrowon

एचटीबिटी बियाणे वाहतूकप्रकरणी वाहन चालकाला अटक 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

चंद्रपूर ः एचटीबिटीची अनधिकृत ३५०० पाकिटांची पहिली खेप घेऊन येणाऱ्या वाहनावर कृषी विभागाच्या पथकाकडून रविवारी (ता. ३) कारवाई करण्यात आली. या प्रकरणी चार लाख रुपये किंमतीचे वाहन तसेच अनधिकृत बियाण्यांचा साठा असा एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. 

चंद्रपूर ः एचटीबिटीची अनधिकृत ३५०० पाकिटांची पहिली खेप घेऊन येणाऱ्या वाहनावर कृषी विभागाच्या पथकाकडून रविवारी (ता. ३) कारवाई करण्यात आली. या प्रकरणी चार लाख रुपये किंमतीचे वाहन तसेच अनधिकृत बियाण्यांचा साठा असा एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात अनधिकृत बिटी बियाण्यांचा साठा दाखल होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्याआधारे सुरुवातीला गोंडपिंपरी येथील नाक्‍यावर सापळा लावण्यात आला. परंतु बिटी बियाणे घेऊन येणाऱ्या चालकाने पथकाला त्या ठिकाणी हुलकावणी दिली. त्यानंतर संबंधित वाहन मुल पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेंबळा नाक्‍यावर पोलिसांच्या मदतीने रोखण्यात आले. 

या वाहनात ३५०० पाकिट एच.टी. बियाणे मिळून आले. या प्रकरणी मूल तालुका कृषी अधिकारी प्रकाश कसराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. वाहन चालक मोहम्मद शेख (रा. ताजबाग, नागपूर) याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास मुल पोलिस करीत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...