agriculture news in marathi Drone survey of lands in Sangamner taluka | Agrowon

संगमनेर तालुक्यात जमिनींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

संगमनेर, जि. नगर : संगमनेर तालुक्यातील २४ गावांमधून जाणाऱ्या महारेलच्या नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत तळेगाव पट्ट्यातील नान्नज, पारेगाव खुर्द, पिंपळे आदी गावांमधील जमिनीचे शनिवारी (ता. १७) ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. 

संगमनेर, जि. नगर : संगमनेर तालुक्यातील २४ गावांमधून जाणाऱ्या महारेलच्या नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत तळेगाव पट्ट्यातील नान्नज, पारेगाव खुर्द, पिंपळे आदी गावांमधील जमिनीचे शनिवारी (ता. १७) ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. 

अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी जमिनीच्या मोजणीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. संगमनेर तालुक्यातील २४ गावांमधून हा बहुचर्चित रेल्वे मार्ग जाणार आहे. या मार्गासाठी ४ हजार ७६२ शेतकऱ्यांची ४४७ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. तालुक्यातील नांदूर खंदरमाळ व माळवाडी या दोन गावांतील मोजणी पूर्ण झाली आहे. 

देशातील पहिल्या सेमी हायस्पीड पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची पुणे, नगर व नाशिक या तीनही जिल्ह्यातील नागरिकांना अनेक वर्षांपासून उत्सुकता होती. केंद्र सरकारने या रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

सर्वप्रथम सर्वेक्षण व मोजणी करून ही जमीन ताब्यात घेतली जाणार आहे. पुणे-नाशिक हा २३५ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग नगर- पुणे व नाशिक या जिल्ह्यातून जात आहे. या मार्गावरून ताशी १८० किलोमीटर या वेगाने रेल्वे धावणार आहे. 

प्रस्तावित रेल्वे मार्गावर १८ बोगदे आहेत.

तालुक्यातील सर्वाधिक जमिनीचे संपादन पोखरी हवेली गावातून होणार आहे. नोटिसा देण्याची कार्यवाही सुरूरेल्वेमार्ग जाणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना 
नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

रेल्वेमार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचे मागील तीस वर्षांचे अभिलेख तपासून त्यानंतर ही जमीन खरेदी केली जाणार आहे. साडेसोळा 
हजार कोटींचा प्रकल्प असून, तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा महारेलचा प्रयत्न आहे. या रेल्वे मार्गामुळे नाशिक व पुणे ही दोन महानगरे रेल्वेमार्गाने 
जोडल्याने दळणवळणाची सुविधा वेगवान होणार आहे.


इतर बातम्या
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...