Agriculture news in marathi Drone survey of the village started | Agrowon

गावठाणाचे ड्रोन सर्वेक्षण सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जानेवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या स्वामित्व योजनेंतर्गत देशभरात होणाऱ्या ड्रोन सर्वेक्षणाचा विदर्भातील प्रारंभ मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा या गावात मंगळवारी (ता. १२) जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झाला.   

मूर्तिजापूर, जि. अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या स्वामित्व योजनेंतर्गत देशभरात होणाऱ्या ड्रोन सर्वेक्षणाचा विदर्भातील प्रारंभ मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा या गावात मंगळवारी (ता. १२) जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झाला.   

या वेळी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक विलास शिरोळकर, तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकरी बयस, तालुका भूमी अभिलेख उपअधीक्षक नितीन अटाळे या वेळी उपस्थित होते.
 
नितीन अटाळे यांनी प्रास्ताविकातून ग्रामविकास खात्याच्या या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर या प्रकल्पाची रूपरेषा विलास शिरोळकर यांनी मांडली.

शतप्रतिशत अचूकता असणाऱ्या या प्रकल्पाच्या पूर्ततेअंती आपल्या मालमत्तेच्या मालकीहक्काचा पुरावा म्हणजे आखीव पत्रिका तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सर्वेक्षण प्रकल्पाला सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ग्रामस्थांना केले. त्यानंतर सर्व्हे ऑफ इंडियाचे अनिलकुमार व चौधरी यांनी खापरवाडा गावाचे ड्रोन सर्वेक्षण केले.

हे होतील फायदे...
५४ दिवसांत पूर्णत्वास जाणाऱ्या या स्वामित्व योजनेतील सर्वेक्षणांती प्रत्येक ग्रामस्थाला मालकी हक्काचा कागद म्हणजे घराची आखीव पत्रिका मिळेल. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल. अतिक्रमणामुळे होणारी भांडणे मिटतील. गावठाणातील मोकळ्या जागा नकाशा व आखीव पत्रिकेमुळे सुरक्षित होतील.


इतर ताज्या घडामोडी
तूर विक्रीसाठी ३९८० शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत...
लातूर येथे बुधवारी जवस पीक प्रात्यक्षिकपरभणी ः लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र...
कृषी यंत्रणेला तत्पर करणार ः धीरजकुमारऔरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व...
नगरमध्ये कावळे ‘बर्ड फ्लू’ बाधितनगर ः श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत...
नाशिकमध्ये ‘बर्ड फ्लू’च्या देखरेखीसाठी...नाशिक : राज्यातील विविध भागांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा...
गोसेखुर्दच्या कामात हयगय नको : नितीन...नागपूर : तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही...
ट्रॅक्टर मोर्चाबाबत आज र्वोच्च...नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत...
पावसमधील आंब्याच्या तीन बागांमध्ये...रत्नागिरी : ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांमध्ये...
स्थानिक वाण, प्रक्रिया पदार्थांना हवे ‘...स्थानिक वाण अधिक उत्पादनक्षम नसले, तरी त्यातील...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी...
पुण्यात भाजीपाला आवक घटली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे :...नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि...
कोरोना लसीकरण क्रांतिकारक पाऊल : ...मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक...
सातारा जिल्ह्यात रब्बीची ९५ टक्के...सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत गहू...औरंगाबाद : तीन जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात...
सांगलीत कारखानदारांनी एफआरपीचा केला...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर...
बँकांनी पीक कर्जवाटप वेळेत पूर्ण करावे...नगर:  ‘‘जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांना...
सांगलीत ‘पीएम किसान’च्या अपात्र...सांगली : पंतप्रधान किसान योजनेतील जिल्ह्यातील ५...
सांगली जिल्हा बॅंकेसह १७३ संस्थांच्या ...सांगली : सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे...
नाशिकला मका खरेदीसाठी ५६ हजार क्विंटलचे... येवला : केंद्र शासनाच्या परवानगीनंतर ही...