agriculture news in Marathi drone technology online training in rahuri university Maharashtra | Agrowon

राहुरी कृषी विद्यापीठात ड्रोन टेक्नॉलॉजी विषयी ऑनलाईन प्रशिक्षण

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 मे 2020

आधुनिक शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम पाश्चात्य देशांमध्ये सुरू झाला असला तरी भारतात आता शेतीमध्ये फवारणी, मॅपिंग, पिकांचे निरीक्षण आणि जमिनीचे मूलभूत घटकांचे मूल्यांकन करण्यासाठी शेतीमध्ये ड्रोन वापरत आहे.

नगर ः आधुनिक शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम पाश्चात्य देशांमध्ये सुरू झाला असला तरी भारतात आता शेतीमध्ये फवारणी, मॅपिंग, पिकांचे निरीक्षण आणि जमिनीचे मूलभूत घटकांचे मूल्यांकन करण्यासाठी शेतीमध्ये ड्रोन वापरत आहे. परंतु, शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी आपल्याला संशोधन व विकासाची बरीच कामे करावी लागतील. तसेच हे तंत्रज्ञान शेतीत योग्यप्रकारे कसे वापरावे याचा विचार करणे आवश्यक आहे, असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वेंकट मायंदे यांनी व्यक्त केले. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कास्ट-कासम या प्रकल्पाच्या वतीने काटेकोर शेतीसाठी ड्रोन टेक्नॉलॉजीची मूलतत्त्वे या विषयावर एक आठवड्यांचे ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. वेंकट मायंदे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्यासह संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे, स्वानंद गुधाटे, अजित खर्जुल, शशांका मालगामा आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन नलावडे उपस्थित होते. 

डॉ. मायंदे म्हणाले, ड्रोन व विविध प्रकारच्या सेन्सरच्या साहाय्याने जमिनीतील व पिकातील अन्नद्रव्याची माहिती संकलित करता येते. संकलित केलेल्या या माहितीचे एकत्रित विश्लेषण करून तिला मशीन लर्निंगची जोड दिली तर पिकांना आपोआप योग्य प्रमाणात खते, कीटकनाशके आणी पाणी देता येऊ शकते. आज शेतीला अशा तंत्रज्ञानाची गरज आहे, कि जे स्वयंचलित पद्धतीने शेतात काम करेल आणि पिकांना लागणाऱ्या विविध निविष्ठा देऊ शकेल.

भारतातील ड्रोन कंपन्यांसाठी, एखाद्या विशिष्ट कामासाठी कमी खर्चात ड्रोनची निर्मिती करून ते शेतकर्यांच्या शेतापर्यंत कसे जाईल हे एक मोठे आव्हान असणार आहे. येत्या काही वर्षांत ड्रोन हे शेतकर्यांच्या शेतात काम करण्यासाठी असलेल्या कस्टम हायरिंग सेंटरचा भाग असतील. 

सूत्रसंचालन डॉ. गिरीषकुमार भणगे यांनी केले तर डॉ. मुकुंद शिंदे यांनी आभार केले. या प्रशिक्षणात ७०० प्रशिक्षणार्थींनी ऑनलाइन प्रशिक्षण घेतले. 


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...