ड्रोनने फवारणीतून वाचेल वेळ आणि श्रम ः कृषिमंत्री डॉ. बोंडे
ड्रोनने फवारणीतून वाचेल वेळ आणि श्रम ः कृषिमंत्री डॉ. बोंडे

ड्रोनने फवारणीतून वाचेल वेळ आणि श्रम ः कृषिमंत्री डॉ. बोंडे

अमरावती ः शेतीमालाच्या उत्पादकता वाढीसोबतच वेळ आणि श्रमाची बचत होईल, अशा प्रकारचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. फवारणीसाठी ड्रोनचा पर्यायातूनदेखील हा उद्देश साधता येणार आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. ५) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. अमरावती जिल्ह्यात ड्रोन फवारणीच्या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे. 

कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपन्यांच्या उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर फंड) ड्रोनची उपलब्धता केली जाणार आहे. परंतु ड्रोन शेतीत फवारणी करण्याआधी त्याचे पर्यावरणातील परिणाम, दुष्परिणाम, फवारणीमुळे झालेले साध्य व इतर बाबींचा अभ्यास केला जाणार आहे. या संदर्भातील जबाबदारी कृषी विद्यापीठांवर सोपविण्यात आली आहे. त्यांनी अभ्यासाअंती ड्रोन फवारणीचे निष्कर्ष मांडावे, असे सांगण्यात आले आहे. या निष्कर्षामुळे ड्रोनने फवारणीची परिणामकारता मोजता येईल व त्यानंतरच या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी होणे शक्‍य होणार आहे. त्याकरिता विद्यापीठांनीदेखील या संदर्भाने मिशन मोडवर काम करावे. यापूर्वी अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनने फवारणी करण्यात आली होती. 

बॅंका असंवेदनशील खरीप हंगामात कर्ज वितरणाबाबत बॅंकांचा असंवेदनशीलपणा समोर आला आहे. वारंवार सूचना करूनही बॅंकांच्या कामकाजात सुधारणा झाली नाही. त्याची दखल घेत रिझर्व्ह बॅंकेच्या हे निदर्शनास आणून द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही डॉ. बोंडे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com