सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीर

सोलापूरवर पुन्हा दुष्काळाचे सावट
सोलापूरवर पुन्हा दुष्काळाचे सावट

सोलापूर : ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा आला, तरी जिल्ह्यात पावसाने अद्यापही दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पाण्याचे संकट आणखीनच तीव्र झाले आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहेच, पण त्याहूनही बिकट अवस्था पिण्याच्या पाण्याची झाली आहे. आजही जिल्ह्यात तब्बल ३५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून जिल्ह्यावर पुन्हा दुष्काळाचे सावट आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा जिल्हा सोसतो आहे. यंदा तरी काही दिलासा मिळेल, अशी शक्यता वाटत होती. पण, पावसाने यंदा हंगामाची सुरवातच केली नाही. खरीप हातचा गेला आहे, पण रब्बीबाबतही फारशी आशा राहिलेली नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ५४५ मिलिमीटर आहे. त्यापैकी आतापर्यंत सरासरी २९०.५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पण तोही हलका आणि सरसकट नाही. 

जिल्ह्यातील सर्वच अकरा तालुक्यांत पाण्याची टंचाई सुरू आहे. पण त्यातही सांगोला, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, करमाळा भागात दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवत आहे. या भागातील विहिरी आणि कूपनलिकांनी सहा महिन्यांपूर्वीच तळ गाठला आहे. या भागात शेतीची अवस्था बिकट झाली आहे. पण, पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरू आहे.

पुणे विभागाचा विचार करता सर्वाधिक ३५२ टँकर एकट्या सोलापुरात सुरू आहेत. त्या माध्यमातून ३०७ गावे आणि १ हजार ६५५ वाड्या वस्त्यांवरील सुमारे पावणेचार लाख लोकसंख्येला हे पाणी पुरवले जाते. पावसाची परिस्थिती अशीच राहिली, तर येत्या काही दिवसात ही संख्या पाचशेच्या घरात जाईल, अशी शक्यता आहे. 

टॅंकरची तालुकानिहाय स्थिती

उत्तर सोलापूर २३ 
बार्शी ३०
दक्षिण सोलापूर २९ 
अक्ललकोट १४ 
माळशिरस  २४
माढा  ४४
करमाळा  ४९
पंढरपूर १३
मोहोळ  २७
मंगळवेढा ५१
सांगोला ४८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com