सांगली जिल्ह्यात दुष्काळी पट्ट्यातील पाणीटंचाई यंदा होणार दूर

Drought belt water shortage in Sangli district will be removed this year
Drought belt water shortage in Sangli district will be removed this year

सांगली : जिल्ह्यात ८४ प्रकल्पांत ७ हजार ८५३ दशलक्ष घनफूट इतकी पाणी साठवण क्षमता आहे. सध्या या प्रकल्पांत ४ हजार ५४० दशलक्ष घनफूट म्हणजे ५८ टक्के इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात १ हजार ४०० दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा ३ हजार १४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा अधिक आहे. त्यामुळे जिल्‍ह्यातील दुष्काळी पट्ट्यात पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल.

जिल्ह्यात मध्यम प्रकल्पांची संख्या पाच, तर लघु प्रकल्पांची संख्या ७९ अशी एकूण ८४ प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पांत १ हजार ७६० दशलक्ष घनफूट इतकी पाणी साठवण्याची क्षमता आहे. लघु प्रकल्पांत ६ हजार ९३ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा होऊ शकतो. गतवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ८४ प्रकल्पांत १ हजार ४०० दशलक्ष घनफूट म्हणजे १८ टक्के इतकाच पाणीसाठा होता. दुष्काळी पट्ट्यात परतीच्या पावसाने दडी मारल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. डाळिंब, द्राक्ष पिकांसह हंगामातील पिकेदेखील वाया गेली.

जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. कृष्णा आणि वारणा नदीला महापूर आला. परंतु, दुष्काळी पट्ट्यात पावसाने दडी मारली. परतीच्या पावसाने दुष्काळी पट्ट्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे तेथील मध्यम आणि लघू प्रकल्पांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजार १४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

  • जत तालुक्यात दोन तलाव कोरडे
  • नऊ तलावांत मृत पाणी 
  • ३७ तलावांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणी
  • २० तलावांत ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पाणी
  • ६ तलावांत २५ ते ५० टक्क्यांपर्यंत पाणी
  • ९ तलावांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी
  • तालुकानिहाय प्रकल्प संख्या, पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)

    तालुका प्रकल्प संख्या उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी
    तासगाव ४७५.३६  ८४
    खानापूर  ४५२.६७  ८३
    कडेगाव ७  ४३३.४५ ४८
    शिराळा  ५६९.१४ ६४
    आटपाडी १३ ९७९.५८ ८५
    जत २८ ९६४.८५ ३१
    कवठेमहांकाळ ११ ६८६.१६ ८२
    मिरज ३  ९४.७२  ७८
    वाळवा २  २३.६२ ४९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com