agriculture news in marathi, drought condition critical in maharashtra | Page 2 ||| Agrowon

दुष्काळी भागात दाहकता वाढली
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

सावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळख असणाऱ्या सावळज पूर्व भागात सध्या भीषण दुष्काळी स्थिती उभी आहे. पावसाअभावी यंदा भागातील कोणताच तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही. काही तलाव कोरडे, तर काही मृतसंचय साठ्याखाली आहेत. परिणामी पिण्याच्या पाण्याचा, जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्न उभा आहे. साततच्या दुष्काळी स्थितीमुळे अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. रोजगाराचे प्रमुख केंद्र असणाऱ्या द्राक्ष बागाही पाणीटंचाईमुळे शेतकरी काढून टाकत आहेत. 

सावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळख असणाऱ्या सावळज पूर्व भागात सध्या भीषण दुष्काळी स्थिती उभी आहे. पावसाअभावी यंदा भागातील कोणताच तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही. काही तलाव कोरडे, तर काही मृतसंचय साठ्याखाली आहेत. परिणामी पिण्याच्या पाण्याचा, जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्न उभा आहे. साततच्या दुष्काळी स्थितीमुळे अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. रोजगाराचे प्रमुख केंद्र असणाऱ्या द्राक्ष बागाही पाणीटंचाईमुळे शेतकरी काढून टाकत आहेत. 

तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेली तीन वर्षे नाममात्र पाऊस झाला आहे. सततच्या दुष्काळामुळे नदी, ओढे, नाले, बंधारे, तलाव, कोरडे आहेत. काही भागांत महिसाळ व विसापूर-पुनदी योजनेचे पाणी आले आहे. परंतु या योजना अल्प काळासाठी कार्यान्वित होत असल्याने योजनाचा म्हणावा तितकासा उपयोग शेतकऱ्यांना होत नाही. 
निवडणुकांच्या तोंडावर या योजना काही दिवस कार्यान्वित झाल्या; परंतु सध्या योजना बंद आहेत. उन्हाची दाहकता प्रचंड वाढली असून, नागरिकांचे पाणी व जनावराचे पाणी, चाराप्रश्न उभे असताना या योजना बंद राहिल्याने सर्वांची होरपळ होत आहे. २०१८ च्या पावसाळ्यात पाऊस नसल्याने खरीप व रब्बी वाया गेला आहे. पीकविमा ही समाधानकारक मिळालेले नाही. त्यामुळे खरीप व रब्बी शेतकरी हताश आहेत. 

भागात द्राक्षाचे पीक मोठे आहे, परंतु पाणीटंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा उखडून काढल्या आहेत. तसेच ज्यांच्या विहिरी, बोअर, आटल्या आहेत त्यांनी टॅंकरने विकतचे पाणी घेऊन बागा जागविण्याचा प्रयत्न चालविला आहे. अर्थकारणाचा केंद्र असणाऱ्या बागा संकटात सापडल्याने आर्थिक समीकरणे बदलत जात आहेत. दुष्काळाची दाहकता वाढली असताना लोकसभा निवडणुकांमुळे लोकप्रतिनिधींचे दुष्काळग्रस्तांच्या समस्येकडे दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा निवडणुकांनतर आता तरी दुष्काळग्रस्तांच्या वेदनाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी भागातून होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...