agriculture news in Marathi, drought council of sednet farmers, Maharashtra | Agrowon

पॉलिहॉउस शेडनेटधारकांची बुधवारी कर्जमुक्ती परिषद

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

नगर : संकटात सापडलेल्या पॉलिहॉउस शेडनेटधारक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी अहमदनगर येथे दिनांक १३ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, कोषाध्यक्ष उमेश देशमुख व राज्य पदाधिकारी उदय नारकर यांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेल्या या कर्जमुक्ती परिषदेसाठी राज्यभरातून हजारो पॉलिहॉउस शेडनेटधारक शेतकरी उपस्थित राहणार आहेत. 

नगर : संकटात सापडलेल्या पॉलिहॉउस शेडनेटधारक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी अहमदनगर येथे दिनांक १३ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, कोषाध्यक्ष उमेश देशमुख व राज्य पदाधिकारी उदय नारकर यांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेल्या या कर्जमुक्ती परिषदेसाठी राज्यभरातून हजारो पॉलिहॉउस शेडनेटधारक शेतकरी उपस्थित राहणार आहेत. 

नगर येथील सैनिक कल्याण समिती लाॅन्स  येथे सकाळी ११ वाजता होत असलेल्या या परिषदेमध्ये शेडनेट पॉलिहाउस धारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी न्यायालयीन लढाई लढण्याबाबत तयारी केली जाणार आहे. उद्योग तोट्यात गेल्याने बँका उद्योगांना कर्जात सूट देतात त्याच धर्तीवर पॉलिहाउस शेडनेट धारकांना तोट्यात गेल्यावर कर्जात सूट मिळणे अपेक्षित आहे. न्यायालयात यासाठी दाद मागणे आवश्यक आहे. तोट्यात गेलेल्या पॉलिहाउस शेडनेटधारकांनी या न्यायालयीन लढाईची जोरदार तयारी सुरू केली आहे.

परिषदेत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जिल्हावार याद्या बनवून अशा शेतकऱ्यांच्या वतीने कोर्टात दाद मागण्यांबाबत कार्यवाही केली जाणार आहे. संकटग्रस्त पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांनी यासाठी आपला सातबारा उतारा, बँकेचे कर्ज स्टेटमेंट सोबत घेऊन यावे असे आवाहन समन्वय समितीने केले आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठीचे अर्जही या वेळी भरून घेतले जाणार आहेत.

पॉलिहॉउस शेटनेटधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी समन्वय समितीच्या पुढाकाराने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दालनात नुकतीच बैठक झाली. बैठकीत कर्जबाजारी शेडनेट पॉलिहाउसधारकांच्या याद्या व माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून गोळा करण्याबाबत निर्णय झाला आहे. कृषी राज्य मंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीत इतरही अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. परिषदेत या निर्णयांची माहिती देऊन आगामी कार्यवाहीचे नियोजन करण्यात येणार आहे.

पॉलिहॉउस शेटनेटधारक शेतकऱ्यांनी या परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र पॉलिहॉउस शेटनेटधारक शेतकरी समन्वयक समितीचे बाळासाहेब दरंदले, बाळासाहेब गडाख, अरविंद देसाई, प्रल्हाद बोरसे, अंकुश पडवळे, दिलीप डेंगळे, किरण अरगडे, महेश शेटे, सुजाता थेटे, मनोज आहेर, अण्णा सुंब, शिवाजी तळेकर, अनिरुद्ध रेडेकर, शिवाजी नाईक, संजय तळेकर, नामदेव जाधव, विकास वाघ, भालचंद्र दौंडकर, वासुदेव चौधरी आदींनी केले आहे.


इतर बातम्या
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
महिला बचत गट आर्थिक प्रगतीचा मार्ग ः...सोलापूर  ः  महिला बचतगट हे ग्रामीण...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...