Agriculture news in marathi, Drought Crisis in Nanded, Parbhani, Hingoli Districts due to stop of rain | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पुरेशा पावसाअभावी दुष्काळाचे संकट गडद

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही मंडळांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस होत आहे. परंतु, बहुतांश मंडळांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामावरील दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे. दरम्यान, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७१ मंडळांमध्ये गुरुवारी (ता.२२) सकाळी आठपर्यंत हलका ते मध्यम पाऊस झाला.

या तीन जिल्ह्यांतील अनेक मंडळामध्ये गेल्या १० ते १५ दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे जमिनीतील ओलावा संपुष्टात आला आहे. उन्हामुळे तापमान वाढले आहे. त्यामुळे पिके सुकत आहेत. वाढीच्या, परिपक्वतेच्या अवस्थेतील पिके सुकून जात आहेत. 

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही मंडळांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस होत आहे. परंतु, बहुतांश मंडळांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामावरील दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे. दरम्यान, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७१ मंडळांमध्ये गुरुवारी (ता.२२) सकाळी आठपर्यंत हलका ते मध्यम पाऊस झाला.

या तीन जिल्ह्यांतील अनेक मंडळामध्ये गेल्या १० ते १५ दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे जमिनीतील ओलावा संपुष्टात आला आहे. उन्हामुळे तापमान वाढले आहे. त्यामुळे पिके सुकत आहेत. वाढीच्या, परिपक्वतेच्या अवस्थेतील पिके सुकून जात आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ३७ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड, अर्धापूर, मुदखेड, हदगाव, किनवट, हिमायतनगर, भोकर, उमरी, धर्माबाद, नायगाव, बिलोली, देगलूर, लोहा तालुक्यातील मंडळांमध्ये पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी २४ मंडळामध्ये पावसाने हजेरी लावली. परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा तालुक्यात हलका पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी १० मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यात पावसाने हजेरी लावली. हलका ते मध्यम पावसामुळे पिकांना फायदा होत आहे. परंतु विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होण्यासाठी सर्वदूर जोदार पावसाची गरज आहे.

मंडळनिहाय पाऊस (मिमी)

नांदेड जिल्हा नांदेड शहर ३८, नांदेड ग्रामीण ८, तुप्पा ३६, विष्णुपुरी २५, वसरणी २८, वजीराबाद २७, तरोडा १५, लिंबगाव १०, अर्धापूर ६, दाभड १२, मुदखेड ११, मुगट ७, बारड ५, तामसा ३, शिवणी १७,सरसम ५, भोकर २६, किनी १७, मोगाली ५, मातुल ६, उमरी ११, शिंदी ४, गोलेगाव ६, धर्माबाद १, जारिकोट ८, करखेली २६, नायगाव ६, नरसी ४, बरबडा ४, कुंटूर ४, बिलोली १३, लोहगाव ८, सगरोळी ५, शहापूर १, कलंबर १, शेवडी ३, कापसी १२.
परभणी जिल्हा परभणी शहर १, परभणी ग्रामीण २, सिंगणापूर ५, दैठणा ३, पिंगळी ९, जांब ३, पालम १, पूर्णा ७, ताडकळस ६, चुडावा २, लिमला १, सोनपेठ १७, आवलगाव ५, सेलू ४४, देऊळगाव १५, कुपटा ३, वालूर ३, चिकलठाणा ३, पाथरी १८, बाभळगाव २, हदगाव ७, मानवत ३, केकरजवळा १२, कोल्हा २७.
हिंगोली जिल्हा आखाडा बाळापूर ९, डोंगरकडा ६, वारंगा फाटा ६, वसमत ५, हट्टा ४, गिरगाव ७, कुरुंदा ५, टेंभुर्णी ६, हयातनगर ३, येळेगाव ४.

 


इतर बातम्या
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमानपुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’चक्रीवादळ अलिबागनजीक...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...