agriculture news in marathi, Drought famine survey in Solapur by Central team | Agrowon

सोलापुरात केंद्रीय पथकाकडून दुष्काळाची धावती पाहणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

सोलापूर : दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने मंगळवेढा तालुक्‍यातील आंधळगाव आणि सांगोला तालुक्‍यातील राजापूर गावांना गुरुवारी (ता.  ६) सकाळी भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची माहिती घेतली. हा दौरा फक्त रडणाऱ्यांचे डोळे पुसणारा ठरला. व्यस्त आणि घाईचा असा हा दौरा झाला. कुठे रस्त्यात थांबून, बांधावरुन संवाद साधून पथक सांगलीकडे मार्गस्थ झाले.  

सोलापूर : दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने मंगळवेढा तालुक्‍यातील आंधळगाव आणि सांगोला तालुक्‍यातील राजापूर गावांना गुरुवारी (ता.  ६) सकाळी भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची माहिती घेतली. हा दौरा फक्त रडणाऱ्यांचे डोळे पुसणारा ठरला. व्यस्त आणि घाईचा असा हा दौरा झाला. कुठे रस्त्यात थांबून, बांधावरुन संवाद साधून पथक सांगलीकडे मार्गस्थ झाले.  

केंद्रीय पथकामधील एफसीआयचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना, उपसंचालक एम. जी. टेंभुणे, चारा विशेषज्ञ विजय ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड,  कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांतधिकारी प्रमोद गायकवाड, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कृषी उपसंचालक रवींद्र माने आदी उपस्थित होते.

आंधळगाव येथील शेतकरी सीताराम वेळापुरे यांच्या शेतीची पाहणी करून पथकाने उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. खरीप हंगामातील पेरणी, आलेले उत्पादन, झालेला खर्च, जनावरांसाठी चारा आदीची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर सांगोला तालुक्‍यातील राजापूर येथील शेतकरी मधुकर तोडकरे यांच्या शेतीची आणि यशवंत पुजारी यांच्या विहिरीची पाहणी करण्यात आली. विहिरीत टॅंकरने पाणी सोडत असल्याचे पुजारी यांनी सांगितले.

राजापूर येथे शेतकऱ्यांकडून दुष्काळाबाबत माहिती जाणून घेतली. आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थितीबाबत पथकातील अधिकाऱ्यांना माहिती दिली. एकूणच ठरलेली माहिती, ठरलेले प्रश्‍न विचारत शेतकऱ्यांना आश्‍वस्त करून पथकाने सांगलीकडे कूच केले.

‘त्वरित चारा, फळबागा वाचवा,
कोरडवाहू गावांचा दर्जा द्या`

खरीप पिके जळून गेली. पावसाअभावी रब्बी पेरणीही करता आली नाही. चाऱ्या अभावी जनावरे कत्तलखान्याकडे चालली आहेत. त्यांना वाचविण्यासाठी त्वरीत चारा द्या, लाखो रुपये खर्चून उभारलेल्या फळबागा जळून जात आहेत. त्या वाचविण्यासाठी मदत करा, कायम दुष्काळी गावांना कोरडवाहू गावांचा दर्जा द्या, आदी मागण्या केंद्रीय पथकाकडे आंधळगांव (ता. मंगळवेढा) येथील शेतकऱ्यांनी केल्या. पावसावर अवलंबून असणाऱ्या गावात दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. या ठिकाणी दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात. कायम दुष्काळी गावांना कोरडवाहू गावांचा दर्जा देऊन शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा लाभ द्यावा, मागेल त्याला सामूहिक शेततळे द्यावे, फळबागा वाचविण्यासाठी टॅंकरणे पाणी घालणे, सेंद्रिय मल्चिंग करणे, फळझाडावर शेडनेट टाकण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी दुष्काळी कोरडवाहू गाव संघर्ष समितीचे निमंत्रक अंकुश पडवळे यांनी केली. प्रदीप खांडेकर, शेतकरी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...